घरमनोरंजन'या' सेलिब्रिटींनी कर्करोगावर केलीय यशस्वी मात, आता करतात जनजागृती

‘या’ सेलिब्रिटींनी कर्करोगावर केलीय यशस्वी मात, आता करतात जनजागृती

Subscribe

महिमा चौधरीप्रमाणेच याधीही अनेक सेलिब्रिटींना कर्करोगाने ग्रासलं आहे. मात्र, अनेकांनी त्यावर यशस्वी मात केली. अशाच कर्करोग ग्रस्त यौद्धांविषयी आपण पाहुयात. 

गेल्या काही वर्षांत कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचं (Cancer) प्रमाण वाढलं आहे. नुकतंच, अभिनेत्री महिमा चौधरीने (Mahima Chaudhari) तिला कर्करोग झाल्याचं जाहीर केलं. ‘परदेस’ चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. याचा खुलासा करत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर महिमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (This celebrities successfully beat cancer, now creating awareness)

महिमा चौधरीप्रमाणेच याधीही अनेक सेलिब्रिटींना कर्करोगाने ग्रासलं आहे. मात्र, अनेकांनी त्यावर यशस्वी मात केली. अशाच कर्करोग ग्रस्त यौद्धांविषयी आपण पाहुयात.

- Advertisement -

मनिषा कोईराला

मनिषा कोईराला हिला २०१२ साली ओव्हेरियन कॅन्सरचे निदान झाले होते. कर्करोगाची माहिती मिळताच तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू केली. अनेक वर्ष न्यूयॉर्मध्ये राहून तिने उपचार पूर्ण केले. कर्करोगमुक्त झाल्यावर तिने कॅन्सरविषयी जनजागृती करायला सुरुवात केली. याकाळात तिने तिचे अनुभव, तिला मिळालेलं प्रेम आणि तिची सकारात्मकता लोकांसोबत शेअर केली. यासाठी तिने पुस्तकही लिहिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने केली करोडोंची कमाई, तर अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ झाला फ्लॉप

सोनाली बेंद्रे

९० च्या दशकांत चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेली सोनाली बेंद्रे हिलाही २०१८ मध्ये कर्करोग झाला होता. या आजाराने तिला प्रचंड वेदना आणि त्रास दिला. मात्र, तिने हिंमतीने यावरील उपचार पूर्ण केले आणि कर्करोगावर मात केली.

लिसा रे

अभिनेत्री लिसा रे हिला २००९ साली ब्लड कॅन्सर झाला होता. तिनेही याविरोधात चांगला लढा देत कर्करोगावर मात केली. याकाळता अनुभवही तिने शब्दबद्ध केला आहे.  ‘Close To The Bone: A Memoir’ हे तिने लिहिलेले पुस्तक असून यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

हेही वाचा सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये शाहरूख खानची जबरदस्त एंट्री

बार्बरा मोरी

बार्बरा मोरी या अभिनेत्रीलाही २००७ मध्ये कर्करोगाने ग्रासलं होतं. तिला स्तनाचा कर्करोग झाला होता. आजारातून बाहेर पडल्यानंतर तिने या विषयी महिलांमध्ये बरेच उपक्रम राबविले आणि जनजागृती केली. अनेक जणींसाठी ती एक प्रेरणा ठरली आहे.

ताहिरा कश्यप

आयुष्यमान खुरानाची पत्नी, निर्माती, लेखिका ताहिरा कश्यप यांनाही २०१८ साली स्तनाचा कर्करोग झाला होता. पण तिने असा एक यशस्वी लढा दिला ज्यामुळे असंख्य कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांना दिलासा आणि बळ मिळालं.

हमसा नंदिनी

तेलगू अभिनेत्री हमसा नंदिनी हिलाही स्तनाचा कर्करोग झाला होता. मात्र तिने धाडसाने उपचार पूर्ण केले. सध्या तिच्यावर केमोथेरेपीचे उपचार सुरू आहेत.

वाचा काजोल सेटवर धडपडली की पिक्चर हीट होतो? सचिन खेडेकर उलगडणार रहस्य

किरण खेर

किरण खेर यांना २०२१ मध्ये रक्ताचा कर्करोग झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून एका कार्यक्रमाचं परीक्षणही त्या करत आहेत.

नासिफा अली

२०१८ मध्ये अभिनेत्री नासिफा अली यांना ओव्हेरियन कॅन्सर झाला होता. त्यांनी या आजारावर मात केली असून त्यांनी कर्करोगाविरोधातील जनजागृती सुरू केली आहे.

वाचा – रात्री साडेनऊ वाजता सुरु झालेला प्रयोग पहाटेपर्यंत सुरू होता, शरद पोंक्षेंनी सांगितला मी नथुराम गोडसे नाटकाचा प्रसंग

राकेश रोशन

अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला होता. मुलगा ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली होती.

अनुराग बसू

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या अनुराग बसू यांनाही कर्करोग झाला होता. ‘बर्फी’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘गँगस्टर’ यासारखे चित्रपट देणाऱ्या अनुराग यांना रक्ताचा कर्गरोग झाला होता. तुम्ही केवळ दोन महिने जगू शकता असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनुराग यांनी कर्करोगावर मात केली आहे.

वाचा – सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने दिली नात्याची कबुली; पोस्ट शेअर करून केला खुलासा

संजय दत्त

संजय दत्तलाही फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. पण आता संजय कर्करोगमुक्त झाला असल्याचं त्याने स्वतः सांगितलं आहे. संजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही बातमी होती.

शरद पोंक्षे

काही वर्षांपूर्वीच शरद पोंक्षे यांनाही कर्करोग झाला होता. मात्र, या असाध्य आजारावर मात करत ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. इतकंच नाही तर त्यांन कलाविश्वात पुन्हा कमबॅकही केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -