घरमनोरंजनमुनमुन दत्ता ऊर्फ बबिताजी सोबत क्लास टीचरने केली 'ही' लज्जास्पद गोष्ट

मुनमुन दत्ता ऊर्फ बबिताजी सोबत क्लास टीचरने केली ‘ही’ लज्जास्पद गोष्ट

Subscribe

मला प्रत्येक माणसापासून चिढ होऊ लागली. मला सतत असे वाटयचे की हा व्यक्ती अपराधी आहे.मला प्रत्येक माणसापासून चिढ होऊ लागली. मला सतत असे वाटयचे की हा व्यक्ती अपराधी आहे

 

सब टिव्ही वरील  ‘तारक मेहता का ऊल्टा चष्मा’ या सुप्रसिध्द मालिकेमधून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच सर्वांची आवडती बबिता जी तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वानाच घायाळ केलं आहे. आजपर्यंत बबिता जी या खास ओळख मिळवणाऱ्या मुनमुनच्या दत्ताचे खाजगी आयुष्यात देखिल अनेक खळबळजनक घटना घडल्या आहेत. मुनमुनच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा आज करणार आहोत.2008 साली मुनमुन अभिनेता अरमान कोहलीला डेट करत होती. बिग बॉस या घराचे सदस्य असणाऱ्या अरमान कोहलीच्या रागाला प्रत्येक लोकांना चांगलीच ओळख झाली आहे. वेलेंटाइन्स सारख्या स्पेशल दिवशी मुनमुनच्या बॉयफ्रेंडन अरमानने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि याच कारणास्तव लवकरच दोघांच्या नात्याला फुल स्टॉप लागला.

- Advertisement -

या मारहाणी नंतर मुनमुन दत्ता हिने पोलिसांकडे धाव घेत अरमान विरोधात गुन्हा दाखल केला. इतकेच नाही तर संबधित मारहाणीचे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते. या नंतर अरमानला मुनमुनची माफी मागावी लागली तसेच कोर्टाने अरमानला दंड देखिल ठोठावला होता. गेल्या काही दिवसांत #metoo प्ररणादरम्यान मुनमुनने तिच्या आयुष्यातील घटनांचा उलगडा केला होता. “प्रत्येक महिलेला आयुष्यात कधी ना कधी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते आणि हे कोणत्याही वयात घडू शकते. लहानपणी मी आमच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका माणसाला घाबरत होती कारण जेव्हा-जेव्हा मी त्यांना एकटी दिसायची तेव्हा ते मला पटकन बिलगत असे. तसेच ते मला धमकी द्यायचे की कोणालाही हे कळता कामा नये. इतकेच नाही तर वयाच्या 13 व्या वर्षी माझ्या ट्यूशन टीचरने माझ्या अंडर पँन्टमध्ये हात टाकला होता. त्यावेळेस मला काहीच कळाले नाही की माझ्या सोबत काय होत आहे. आणि तेव्हा पासुनच मला प्रत्येक माणसापासून चिढ होऊ लागली. मला सतत असे वाटयचे की हा व्यक्ती अपराधी आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – राज कपूर पार्टीत जाताना घरातली व्हिस्की न्यायचे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -