Rakshabandhan 2022: बॉलिवूडमधल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या बहिणीलाच बांधतात राखी

बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्री त्यांच्या बहिणीलाच राखी बांधतात आणि रक्षाबंधन साजरे करतात. बॉलिवूड मधील याच बहिणींबद्दल जाणून घेऊया. 

भाऊ आणि बहिणीचं स्पेशल नातं सांगणारा राक्षबांधन(rakshabandhan 2022) हा सण आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. बहीण भावंडं गमतीत का होईना कितीही भांडले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र एकत्र येतात. बहीण भावाला राखी बांधते या क्षणाची अनेक भावंडं वर्षभर वाट पाहत असतात. रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येकासाठीच खुप खास असतो. बॉलिवूडमधील अभिनेत्री सुद्धा राक्षबांधनाचा दिवस खूप उत्सहात आणि आनंदात साजरा करतात. बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्री त्यांच्या बहिणीलाच राखी बांधतात आणि रक्षाबंधन साजरे करतात. बॉलिवूड मधील याच बहिणींबद्दल जाणून घेऊया.

हे ही वाचा – ‘कॉफी विथ करण ७’मध्ये तुला का नाही बोलावलं? या प्रश्नावर तापसीनं दिलं सणसणीत उत्तर…नेटकऱ्यांनी केलं कौतुक

१) तापसी पन्नू आणि शगुन पन्नू –

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू तिची बहिण शगुन पन्नू हिला दरवर्षी राखी बांधते. तापसी पन्नू एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांनाच माहित आहे पण तिची बहीण शगुन पन्नू ही २००६ मधील मिस इंडियाची फायनॅलिस्ट आहे. शगुन सध्या एक इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालवते आहे. तापसी सुद्धा त्यात भागीदार आहे.

 

२) करिष्मा कपूर आणि करीना कपूर –

करिष्मा आणि करीना या दोन बहिणींमधला स्पेशल बॉण्ड नेहमीच त्यांच्या चाहत्यांना दिसतो. या दोन बहिणींमध्ये मैत्रीचं नातं सुद्धा आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या दोन बहिणीसुद्धा एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधन साजरे करतात.

 

३) मलायका अरोरा आणि अमृता अरोरा

मालयाका आणि अमृता या दोन्ही बहिणी स्वभावाने खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहेत. या दोन्ही बहिणींनाच बॉण्ड सुद्धा खूप सपशेल आहे. या दोघीही नेहमी वेगवगेळ्या लूक मध्ये दिसतात. मलायका आणि अमृता या दोघी एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधनाचा दिवस साजरा करतात.

हे ही वाचा –  भारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

४) दीपिका पदुकोण आणि अनिशा पदुकोण

दीपिका आणि अनिशा या दोघी बहिणी त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी या दोन बहिणी एक मेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करतात.

 

५) काजल अग्रवाल आणि निशा अग्रवाल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल ही नेहमीच चर्चेत असते. काजल अग्रवाल आणि निशा अग्रवाल या दोन बहिणी सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतात. काजल आणि निशा सुद्धा दरवर्षी एकमेकींना राखी बांधतात.