या घटनेने मला हादरवून टाकलंय, उदयपूर हत्या प्रकरणावर कंगना संतापली

अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे

राजस्थानमधील उदयपूर येथे नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या एका व्यवसायिकाची तलवारीने गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना मंगळवारी घडली. हल्लेखोरांनी या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. कन्हैयालाल तेली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कपडे शिवण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती कन्हैयालालच्या दुकानात आले होते. त्यानंतर त्यांनी कन्हैया लालवर तलवारीने सपासप वार करत त्याचा गळा चिरला. यात कन्हैयालालचा सहकारीही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेविरोधात संपूर्ण भारतातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या प्रकणारवर अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने हत्या झालेल्या कन्हैयालालचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्या खाली लिहिलंय की, “नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याने या व्यक्तीची अमानुष मारहाण करण्यात आली आणि जिहादींनी हा व्हिडिओ केला. ते लोक दुकानात मुद्दाम घुसले. त्यानंतर मोठमोठ्या घोषणा देऊ लागले. हे सर्व देवाच्या नावावर सुरू होतं.”

तसेच कंगनाने अजून एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये कन्हैयाची हत्या करणारे दोन्ही आरोपी दिसत आहेत. या फोटोवर कंगनाने लिहिलंय की, “देवाच्या नावावर त्यांनी कन्हैयालालची हत्या केली असून ते फोटोसोठी पोज देखील देत आहेत. या घटनेने मला हादरवून टाकलंय. हा व्हिडिओ पाहण्याची माझ्यात हिमंत नाही”.


हेही वाचा :‘शेरशाह’ नंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी झळकणार ‘या’ सिनेमात