घरमनोरंजनतुनिषा आत्महत्या : हे लव्हजिहाद प्रकरण नाही, शीजान दर्ग्यातही जात नाही... वकिलांनी दिली माहिती

तुनिषा आत्महत्या : हे लव्हजिहाद प्रकरण नाही, शीजान दर्ग्यातही जात नाही… वकिलांनी दिली माहिती

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. 24 डिसेंबर रोजी तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. सुरुवातील शीजानला 4 दिवसाची पोलिस कोठडी झाली होती. या प्रकरणात त्याची कसूली चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप काहीही माहिती न मिळाल्याने शीजानच्या कोठीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, आता शीजान खानच्या वकीलांनी देखील तुनिषाच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शीजान खानच्या वकीलांनी तुनिषाचे काका पवन शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वकीलांच्या मते ते मुद्दाम या प्रकरणात धर्म मध्ये घेत आहेत.

- Advertisement -

शीजानचे वकील पुढे म्हणाले की, पोलिसांकडे कोणताच पुरावा नाही, त्यांनी जबरदस्ती शीजानला अटक केली आहे. शीजानला मीडिया ट्रायलच्या प्रेशरमध्ये येऊन अटक करण्यात आली. त्यांनी fIR मध्ये जे तथ्य ठेवले आहेत. जर ते फेस व्हॅल्यूच्या आधारे पाहिले तरी केस बनू शकत नाही.

पवन शर्मा तुनिषाचा कोणीही नाही
शीजानचे वकील पुढे म्हणाले की, पवन शर्मा म्हणतात ते तुनिषाचे मामा आहेत. पवन शर्माचं तुनिषा शर्माच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. पवन शर्मा कोण आहे. काय आहे. सोमवार सकाळ पर्यंत पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला सांगू. एक निरापराध मुलगा तुरुंगात आहे. कोणी या पूर्ण प्रकरणाला मिसगाईड केलं आहे.

- Advertisement -

हे लव-जिहाद प्रकरण नाही
वकील म्हणाले की, शीजान स्वतः कधीही दरग्यात जात नाही. तो तुनिषाला का घेऊन जाईल? हे सगळे आरोप खोटे आहेत. हे प्रकरण लव-जिहाद असूच शकत नाही.


हेही वाचा :

तुनिषाला शीजानकडून हिजाबची सक्ती..आईच्या आरोपावरून आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -