घरमनोरंजनही आहे श्रद्धा कपूरची वहिनी, 'या' खास व्यक्तीची होणार एन्ट्री?

ही आहे श्रद्धा कपूरची वहिनी, ‘या’ खास व्यक्तीची होणार एन्ट्री?

Subscribe

अभिनेते शक्ती कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या शक्ती कपूर यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कपूर कुटुंबात एका खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द सिद्धांतने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिद्धांत याने रिलेशनशीबाबत कबुली दिली आहे. सध्या सर्वत्र शक्ती कपूर यांच्या लेकाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये सिद्धांत त्याची गर्लफ्रेंड अंतरा राजकुमारी हिच्यासोबत दिसत आहे. अंतरा हिच्यासोबत खास फोटो पोस्ट करत सिद्धांतने कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा फोटोग्राफर म्हणतो, एकमेकांकडे पाहून स्माईल करा…’ सिद्धांत याच्या पोस्टवर फक्त चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या दोघांच्या फोटोमुळे त्यांचे चाहते खुश आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddhanth Kapoor (@siddhanthkapoor)

- Advertisement -

 याबद्दल सांगायचं झालं तर, सिद्धांत याने लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अंतरा हिच्यासोबत असलेलं नातं सिद्धांत यांने कंफर्म केलं आहे. सिद्धांतने सर्वांसमोर नात्याची कबुली दिल्यानंतर शक्ती कपूर यांच्या कुटुंबात लवकरच नव्या व्यक्तीची एन्ट्री होईल असं देखील सांगण्यात येत आहे. पोस्ट केलेल्या फोटोंवर एका चाहत्याने लिहिले आहे की, दोघं एकमेकांसाठी बनले आहेत. तर बहीण श्रद्धा कपूर हिने हसणारे इमोजी बनवले आहे.

बहीण श्रद्धा कपूर हिच्याप्रमाणे सिद्धांत कपूर लाईमलाईटमध्ये नसतो. श्रद्धा देखील कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान श्रद्धा हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘सुंदर दिसत आहे, लग्न करू का?’ असं लिहिलं होतं. ज्यामुळे श्रद्धा हिच्या देखील लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता.

- Advertisement -

श्रद्धा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रद्धा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -