Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रिकामे फ्लॅट, बंगले कोरोनाग्रस्तांना द्यायची हीच ती वेळ, भरत जाधवने कर्तव्य बजावण्याचे...

रिकामे फ्लॅट, बंगले कोरोनाग्रस्तांना द्यायची हीच ती वेळ, भरत जाधवने कर्तव्य बजावण्याचे केले आवाहन

संपूर्ण देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या या संकटात आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोरोना रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. संपूर्ण देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या या संकटात आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोरोना रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सर्व कोरोनाग्रस्तांसाठी हा कठिण काळ आहे. अशातच भरत जाधवने कोरोना रुग्णांसाठी राबवलेल्या उपक्रमाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. कोरोना रुग्णांसाठी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, गाळे देण्याचे आवाहन त्याने या पोस्टद्वारे केले आहे. एक फोटो शेअर करत त्याने असे म्हटले आहे की, ”सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे.. माझ्या सोसायटी मध्ये ४ जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकाचे फ्लॅट वन बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटी मधील २ रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिप्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा-औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा ६ महिन्याचा मॅंटेनेन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सगळे बरे झाले, आता तेच फ्लॅट इमरजेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा प्रयत्न…

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

- Advertisement -

आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे. अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची अशा प्रकारे पोस्ट करत भरत जाधवने कोरोना रुग्णांसाठी राबवलेल्या रुग्णांचे आवाहन केले आहे. भरत जाधवच्या या पोस्टवर खरोखरच स्तुत्य उपक्रम असल्याचे नेटकरी म्हणत आहे. प्रेक्षकांच्या अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळताना भरभरुन प्रतिसादही मिळत आहे.


हे वाचा-  दिग्गज अभिनेते- निर्माते ललित बहल यांचे कोरोनाने निधन

- Advertisement -