Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर 'या' मराठी सेलिब्रिटी जोडप्याने दिली आनंदाची बातमी

गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर ‘या’ मराठी सेलिब्रिटी जोडप्याने दिली आनंदाची बातमी

या मराठी सेलिब्रिटी जोडप्याने आपल्या नात्याची कबुली देत आपला साखरपुडा देखील एक वर्षापूर्वी झाल्याची बातमी दिली होती. आता या जोडप्याने आपल्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार हे विवाहबंधनात अडकल्याचे आपण पाहत आहोत. कोणी आपल्या नात्याची कबुली देत आहेत, तर कोणी थेट साखरपुडाच उरकुन घेत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अनेक कलाकारांनी आपली लग्न पुढे ढकलले होते. त्यामुळे या वर्षी बरेच कलाकारांनी लग्न उरकले. असेच एका मराठी सेलिब्रिटी जोडप्याने आपल्या नात्याची कबुली देत आपला साखरपुडा देखील एक वर्षापूर्वी झाल्याची बातमी दिली होती. आता या जोडप्याने आपल्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला आहे. दुनियादारी फेम अभिनेत्री ऋचा आपटे आणि अभिनेता क्षितिष दाते यांनी साखरपुडा नंतर आता गुपचूप लग्नही उरकून घेतले आहे. ऋचा आणि क्षितिशने त्यांच्या सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

- Advertisement -

त्यांच्या इन्स्टाग्रामस्टोरी वर त्यांनी ही माहिती दिली आहे. क्षितिश आणि ऋचाने त्यांच्या लग्नातील एकही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला नाही. मात्र सिनेसृष्टीतील त्यांच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नाचा फोटो पाहता ऋचाने नेसलेल्या हिरव्या रंगाच्या साडीत ती फारच सुंदर दिसत आहे.

- Advertisement -

ऋचा आणि क्षितिशने गेल्यावर्षीच त्यांचा साखरपुडा केला होता. मात्र इतरांप्रमाणे बातमी चाहत्यांसोबत शेअर केली नव्हती. परंतु त्यांच्या साखरपुड्याला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. तसेच साखरपुड्याच्या एका वर्षानंतर फोटो शेअर केले होते. मात्र आता या दोघांनीही लग्नगाठ बांधली असून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rucha apte (@rucha.apte)

 ऋचा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये झळकली होती. सध्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत ऋचा काम करत आहे. या शिवाय मराठी सिनेमा आणि नाटकांतून ही तिने म्हत्तवपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच क्षितिश याने ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमात काम केले आहे. विशेष म्हणजे ऋचा आणि क्षितिश ‘बन मस्का’ या मालिकेतून एकत्रित काम करत होते. मालिकेदरम्यान दोघांची मैत्री झाली होती.


हे वाचा-  सलमान खानच्या राधे चित्रपटातील ‘सिटी मार’ गाणे झाले रिलीज

- Advertisement -