घरताज्या घडामोडी'बधाई हो'च्या सिक्वलमध्ये आयुष्मान नव्हे 'ही' भन्नाट जोडी करणार स्क्रीन शेअर

‘बधाई हो’च्या सिक्वलमध्ये आयुष्मान नव्हे ‘ही’ भन्नाट जोडी करणार स्क्रीन शेअर

Subscribe

जूनपासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असून 2021 मध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने खळखळून हसवून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता याच हास्याचा डबल डोस घेऊन ‘बधाई हो’चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंरतु यामध्ये नवा ट्विस्ट असून आयुष्मान खुराना आणि सायना मल्होत्रा यांची जोडी प्रेक्षकांना या सिक्वलमध्ये दिसणार नाही. त्याऐवजी बॉलीवूडमधील आणखी एक तगडी जोडी दिसणार आहे.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. राजकुमारचा हटके कॉमेडी अंदाज आणि भूमीच्या घ्यायाळ अदांचे कॉम्बिनेशन असणारा हा चित्रपट असेल. त्यामुळे या सिक्वलचे नावच ‘बधाई दो’ असे असणार आहे. जूनपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून २०२१ मध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यामध्ये राजकुमार राव पोलीस तर भूमी पीटी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमी आणि राजकुमारने या सिक्वलमध्ये काम करण्यास पसंती दर्शवली असून आता चाहते देखील या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


हेही वाचा – मनसे, भाजप एकत्र येणार?

दरम्यान, या सिक्वलसाठी राजकुमाचे नाव आधीच घोषित करण्यात आले होते. त्यानंतर भूमीचे नावही या चित्रपटासाठी देण्यात आले. ‘बधाई हो’ या फ्रँचायझीमध्ये आधीपासूनच काम करण्याची इच्छा होती, अस भूमीने म्हटले आहे. २०१८ मधील ‘बधाई हो’ ने मनोरंजनासह एक सामाजिक विषयही चित्रपटातून हाताळला होता. त्यामुळे या सिक्वलमध्ये मनोरंजनाचा कोणता नवा अंदाज पाहायला मिळेल याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -