मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रनौत हिच्या ‘चंद्रमुखी – 2’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कंगनाच्या लूक्सची चर्चा सर्वत्र सुरू असताना पाकिस्तानच्या अभिनेत्रीने तिच्याविरोधात तिच्या विरोधात मोटे विधान केले आहे. या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव नौशीन शाह असे असून तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगनासंदर्भात एका मुलाखतीत नौशीन म्हणाली, मला कंगनाच्या कानशिलात लगावण्याची आहे. कारण, ती ज्या पद्धतीने माझ्या देशाविषयी काही बोलते आणि ती पाकिस्तानी सेनेविषयी काही बोलते. कंगनाकडे असलेल्या हिंमतीची मी दाद देते. कंगनाकडे अक्कल नाही. पण तिला दुसऱ्या देशाविषयी बोलायेच आहे. तिने स्वत: च्या देशावर लक्ष द्यावे. त्याचबरोबर तिने तिच्या अभिनयाकडे देखील लक्ष द्यावे. कॉन्ट्रॉवर्सी, एक्स लव्हर्स आणि इतर गोष्टींकडे लक्ष दे. ती खूप चांगली अभिनेत्री आणि सुंदर स्री आहे. मला वाईट वाटते. जेव्ही ती इतर देशासंदर्भात बोलते. तेव्हा ती खूप वाईट बोलते. “, असा सल्लाही तिने दिल आहेत.
हेही वाचा – कंगनाने दिली त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाला भेट
नौशीन पुढे म्हणाली, “तिला काय माहिती की, पाकिस्तानमध्ये लोकांना चांगली वागणूक मिळते की नाही? तुला पाकिस्तानच्या सेनेविषयी कासे काय माहिती आहे?, आमच्या देशाच्या एजन्सी विषयी कसे माहिती आहे? यासंदर्भात तर मला स्वत:ला माहिती नाही की सेना आमच्या देशात आहे. कारण यासर्व गोष्टी आम्ही सांगत नाहीत, त्या गुप्त ठेवल्या जातात.”
हेही वाचा – ‘चंद्रमुखी 2’मधील कंगनाचे भरतनाट्यम चर्चेत
‘चंद्रमुखी – 2’ची लवकरच प्रदर्शित होणार
कंगना रनौतने 5 सप्टेंबरला ‘भारत’ हे नाव ‘इंडिया’पेक्षा कसे चांगले आहे. यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. कंगनाचा ‘चंद्रमुखी – 2′ या चित्रपट गणेश चतुर्थीनिमित्ताने प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात सर्व जण उत्सुक आहेत. ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटातील पहिले गाणे ‘स्वागथांजलि’ची पहिली झलक शेअर करण्यात आली ज्यामध्ये कंगना भरतनाट्यम करताना दिसत आहे. यामध्ये कंगना गुलाबी रंगाच्या ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसत असून यात ती कठीण आणि सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.