Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'या' व्यक्तीने साखरपुड्यात अनंत अंबानींना गिफ्ट केला महागडा ‘कार्टियर पँथर ब्रोच’

‘या’ व्यक्तीने साखरपुड्यात अनंत अंबानींना गिफ्ट केला महागडा ‘कार्टियर पँथर ब्रोच’

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 19 जानेवारीला साखरपुडा पार पडला. अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी हा साखरपुडा झाला होता. गुजराती रितीरिवाजाप्रमाणे हा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यापासून अनंत अंबानी आणि राधिका सोशल मीडियावर सतत चर्चेत आहेत. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच अनंत अंबानींनी साखरपुड्यात घातलेल्या शेरवानी वरील ब्रोचने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या ब्रोचने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. हे ब्रोच अनंत यांनी कोणी गिफ्ट केलं असेल असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता. दरम्यान, याचे उत्तर आता समोर आले आहे.

- Advertisement -

या व्यक्तीने अनंत अंबानींना गिफ्ट केला महागडा ब्रोच

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepthi Sasidharan (@lampglow)

साखरपुड्यात राधिकाने गोल्डन कलरचा महागडा डिझायनर घागरा परिधान केला होता. तर अनंत अंबानी यांनी गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. मात्र, आता त्यांच्या कुर्त्यापेक्षा जास्त कुर्त्याच्या कोटवर परिधान केलेल्या ‘कार्टियर पँथर ब्रोच’ची चर्चा रंगली आहे. या ब्रोचची किंमत जवळपास 1 कोटी 13 लाख ते 1 कोटी 32 लाखांच्यामध्ये असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय हा अनंत यांना त्यांचा मोठा भाऊ आकाश अंबानींनी दिला होता. हा महागडा ब्रोच नीलम रत्न, हिरे आणि सोन्यापासून तयार करण्यात आला होता. ‘कार्टियर पँथर ब्रोच’ हा प्लॅटिनम किंवा सोन्यापासून तयार केला जातो. तसेच ब्रोचला हिऱ्यांनी मडवले जाते. या पॅंथरचे चमकणारे डोळे पाचूचे बनवले जातात.


हेही वाचा :

‘पठाण’च्या अनधिकृत प्रदर्शनावर पाकिस्तानातील सिंध सेन्सॉर बोर्डाकडून बंदी

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -