घरमनोरंजनलता मंगेशकरांनंतर 'या' गायिकेला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं

लता मंगेशकरांनंतर ‘या’ गायिकेला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं

Subscribe

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्थान असताना रानू मंडलने सुद्धा या यादीत सातवा क्रमांक पटकावला आहे.

गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्वांची यादी समोर आली आहे. त्यानुसार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पाठोपाठ या यादीत एका रात्रीत स्टार झालेली रानू मंडल यांचे नाव आहे. यावर्षी गुगलवर सर्वाधित सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी गुगलने जाहीर केली आहे. या यादीत इंटरनेट सेंसेशन रानू मंडलचे नाव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्थान असताना रानू मंडलने सुद्धा या यादीत सातवा क्रमांक पटकावला आहे. लता मंगेशकर यांच्याशिवाय गायकांमध्ये केवळ रानू मंडलच यादीत स्थान पटकावू शकली आहे.

- Advertisement -

दरम्यान या वर्षी सप्टेंबर मध्ये रानू मंडलचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने सर्वत्र धमाल उडवून दिली होती. या व्हिडिओत रानू लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा है हे गाणे गाताना दिसत होती. या व्हिडिओतील रानूचा आवाज लोकांच्या एवढा पसंतीस उतरला की रानू एका रात्रीत स्टार झाली.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून रानू यांना एका गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात गायिका अल्का याज्ञिक, हिमेस रेशमिया आमि जावेद अली परीक्षण करत होते. या कार्यक्रमात रानू मंडलच्या टॅलेन्टला पाहून गायक हिमेश रेशमिया यांनी रानूला त्यांच्या हैप्पी अॅन्ड हार्डी या चित्रपटातील एका गाण्याची ऑफर दिली होती.

- Advertisement -

त्यानंतर रानू मंडलने चित्रपट हैप्पी अॅन्ड हार्डी या चित्रपटातील गाणं तेरी मेरी कहानी हे गाणं गायलं. रानूनं गायलेलं हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरलं. यानंतर रानूने हिमेश रेशमीयाच्या आशिकी या गाण्याचं रिमेक व्हर्जन सुद्धा गायलं. हे गाणंसुद्धा खूपच गाजलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वी रानू मंडल एका चाहत्याशी उद्धटपणे वागल्याच्या कारणावरुन विवादात अडकल्या. त्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे रानू यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलसुद्धा करण्यात आलं. त्यानंतर एका मेकओव्हर कार्यक्रममध्ये सुद्धा रानू सहभागी झाल्या होत्या. तेथे त्यांचा मेकअप करण्यात आला होता. पण ओव्हर मेकअपमुळे रानू मंडल यांना पुन्हा ट्रोलर्सचा सामना करावा लागला.

View this post on Instagram

#fashion #ranumondalsong

A post shared by Ranu Mondal⏺️ (@ranumondal.offical) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -