घरमनोरंजन''राजकारण्यांमुळेच ही परिस्थिती उद्भवलीये'', सुनील शेट्टीचा संताप!

”राजकारण्यांमुळेच ही परिस्थिती उद्भवलीये”, सुनील शेट्टीचा संताप!

Subscribe

रोज होणारे मृत्यूदर, ऑक्सिजन आणि बेड्ससाठी वणवण भटकत असलेले कोरोना रुग्णांचे कुटुंबिय ही भीषण चित्र पाहूण अण्णा भडकला असून राजकारण्यांची चांगलीच उचलबांगडी केली आहे.

सध्या संपूर्ण देश कोरोना संकटाशी झुंज देत आहे. कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या, मृत्यूदर व सध्याची संपूर्ण चक्र हे भयानक आहे. या आकडेवारीदरम्यान आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ऑक्सिन, बेड्स, औषधे यांच्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे खटाटोप चालले आहेत. अशा परिस्थितीत सामान्यजनता हवालदिल झाली आहे. यांसंपूर्ण परिस्थितीला अनेकजण सरकारला दोष देत आहेत. तर काही राजकारण्यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या भयानक परिस्थितीवर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. आता बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याने ही राजकारण्यांना नजरेवर धरले आहे. रोज होणारे मृत्यूदर, ऑक्सिजन आणि बेड्ससाठी वणवण भटकत असलेले कोरोना रुग्णांचे कुटुंहीय ही भीषण चित्र पाहूण अण्णा भडकला असून राजकारण्यांची चांगलीच उचलबांगडी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

एका मुलाखतीदरम्यान सुनील शेट्टीने या परिस्थितीसाठी राजकारण्यांना जबाबदार ठरवले आहे. ”राजकारण्यांनी त्यांचे काम चोख बजाबले असते तर आज लोकांवर ही वेळ आली नसती. त्यांना उपचारासाछी वणवण भटकावे लागले नसते. खुर्चीवर बसणारे राजकारणी पुढच्या पाच वर्षात माया कशी जमवायची याचा विचार करता. देशासाठी काय करायचे,याचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. यांना आपणच निवडून दिले आहे आणि आज यांच्यामुळे आपल्यावर बेड्स,ऑक्सिडनसाठी भटकण्याची वेळ आलीये. यांच्यामुळेच ही स्थिती उद्दवलीये. पण काळ बदलतो तसेच सत्तेच्या सिंहासनावर बसलेले हे लोकही बदलतील, देशात कठीण पपिस्थिती आहे आपण सर्वच या परिस्थितून जात आहेत, ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे. ”असे सुनील शेट्टी म्हणाला.

- Advertisement -

हे वाचा-  ऑडिओबुक्स स्टोरीटेलरवरील ‘फुरसुंगीचा फास्टर फेणे’ला अमेय वाघचा आवाज!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -