घरमनोरंजननिखिल चव्हाणने यंदा “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार" सोहळ्यात रोवला मानाचा तुरा

निखिल चव्हाणने यंदा “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार” सोहळ्यात रोवला मानाचा तुरा

Subscribe

मालिका, चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहरा म्हणजे निखिल चव्हाण होय. अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या निखिलचा नाटक, मालिका, चित्रपट, वेबीसिरीज असा वाढतच जाणारा अभिनयकौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे. कुठल्याही कलाकाराचा प्रवास साधा सरळ सोपा असा कधीच नसतो. तसेच आजवर निखिललासुद्धा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याची धडपड, शिकण्याची उर्मीच त्याला आज कामी आली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२” सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण यांस जाहीर करण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक १४ मे २०२२ ला पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले ,खा.सौ.सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. रोहित पवार, आ.संजय जगताप, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजवर सिनेक्षेत्रात या पुरस्काराचे मानकरी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेते अशोक समर्थ हे ठरले होते, यंदा या मानकरांच्या यादीत अभिनेता निखिल चव्हाणने मानाचा तुरा रोवला आहे.

- Advertisement -

याबाबत बोलताना निखिल असे म्हणाला की, “अभिनयक्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीची याहून चांगली पोचपावती असूच शकत नाही, कारण “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२” हा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी मी ठरलो, आणि हा पुरस्कार मला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर मिळाला आहे, आणि किल्ल्यावर पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे, कारण महाराजांचे किल्ले आपल्यासाठी आदरणीय आहेत असे मला वाटते, अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय ती म्हणजे, हा गडकिल्ला इंडियन डिफेन्सच्या हातात आहे, त्या गडकिल्ल्यावर हा पुरस्कार मला मिळाला ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.”

- Advertisement -

 


हेही वाचा :‘गोदावरी’ चित्रपटासाठी जितेंद्र जोशीने पटकावला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -