घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Subscribe

जेष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांनी चित्रपट सृष्टीसाठी जे योगदान दिले त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अशा पारेख यांनी 60 ते 70 च्या दशकात त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं.

चित्रपट सृष्टीमध्ये दादासाहेब फाळके पुसरस्कार मानाचा समाजाला जातो. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळींना त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी दादासाहेब फाळके(dadasaheb phalke award) हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठित मनाला जाणारा जा पुरस्कार यावर्षी जेष्ठ अभिनेत्री अशा पारेख(asha parekh) यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स संदर्भात घोषणा केली.

हे ही वाचा – ‘मी आता मिठाई विकतो’ अभिनेते शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय

- Advertisement -

जेष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांनी चित्रपट सृष्टीसाठी जे योगदान दिले त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अशा पारेख यांनी 60 ते 70 च्या दशकात त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं. बॉलिवूडचा एक काळ अशा पारेख यांच्या चित्रपटांनी गाजवला होता. अशा पारेख 79 वर्षांच्या आहेत. 60 – 70 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून अशा पारेख त्यावेळी चर्चेत होत्या.

ह्ये ही वाचा – हरियाणाच्या वर्षा बुमराने जिंकला ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’च्या तिसऱ्या पर्वाचा किताब

- Advertisement -

अशा पारेख यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. अशा पारेख यांचे कटी पतंग आणि तिसरी मंजिल हे चित्रपट तर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. अशा पारेख यांचे आजही अनेक चाहते आहेत. स्वतःच्या अभिनयाच्या ताकदीवर अशा पारेख यांनी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची वेगली ओळख निर्माण केली. 1959 ते 1973 या काळात विशेषत्वाने अशा पारेख यांनी बॉलिवूडवर जादू केली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(dcm devendra fadanvis) यांनी अशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंद केले आहे.

हे ही वाचा- श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -