घरमनोरंजनघाटी म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडेन - उषा नाडकर्णी 

घाटी म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडेन – उषा नाडकर्णी 

Subscribe
आजवर मला कधी कुणी घाटी म्हटलेले नाही. मात्र जर कोणी मला घाटी म्हणाले तर त्या माणसाचे मी थोबाड फोडेन, अशा तीव्र शब्दात अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी कलाकारांना घाटी म्हणून संबोधणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधले जात असल्याचा गौप्यस्फोट केला. “घाटी लोगो को हिंदी भी नही आती”, ये क्या घाटी कपडा पहना है, उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है अशा शब्दात हिणवले जात असल्याचे तिने सांगितले होते. यासंदर्भात हिंदीमध्ये आपल्या कामाच्या बळावर नाव कमावणाऱ्या उषा नाडकर्णी यांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता त्यांनी अद्यापतरी कुणीही आपल्याला असे हिनवले नाही. मराठी कलाकारांना पुरेसा आदर मिळतो. मात्र आपल्याला कुणी असे म्हणाले तर मात्र मी त्याचे थोबाड फोडेन. त्या शिवाय गुणवत्ता असूनही पैसे पुरेसे दिले जात नाहीत अशीही खंत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -