ठग्स…च्या गाण्याचा टीझर रिलीज, बघा कसं आहे गाणं

कतरिना कैफ नेहमीच्या तिच्या मोहक अदांसाठी प्रसिद्ध आहे. ठग्स...च्या या गाण्यातही तिच्या अशाच काही अदा पाहायला मिळत आहे. तिने गोल्डन गिल्टर ड्रेस घातला असून यात या सिनेमातील साहसी कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे

KATRINA
ठग्समधील मंजुरे खुदा गाण्यातील कतरिनाचा लूक

हिंदी सिनेसृष्टीत सध्या दोन मोठ्या सिनेमांची चर्चा आहे. एक रेड चिली इंटरटेन्मेटचा ‘झिरो’ तर दुसरा यशराजचा ‘ठ्गस ऑफ हिंदुस्तान’ हा सिनेमा… ठ्ग्स हा सिनेमा येत्या ८ नोव्हेंबरला रिलीज होणार असून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी या सिनेमातील छोटे छोटे डायलॉग टीझर स्वरुपात रिलीज करण्यात येत आहे. आता या सिनेमातील एका मंजूर- ए- खुदा या गाण्याचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. यशराज फिल्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या गाण्याची एक झलक रिलीज करण्यात आली आहे.

पाहा- ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’चा Trailer Out!

पाहा गाण्याचा टीझर

कतरिना कैफ नेहमीच्या तिच्या मोहक अदांसाठी प्रसिद्ध आहे. ठग्स…च्या या गाण्यातही तिच्या अशाच काही अदा पाहायला मिळत आहे. तिने गोल्डन गिल्टर ड्रेस घातला असून यात या सिनेमातील साहसी कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं श्रेया घोषाल, सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांनी गायले आहे. अजय- अतुलने या गाण्याचे संगीतकार असून सध्या १ मिनिटं ११ सेकंदाच्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा-‘खुदाबक्श’ अमिताभचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’मधील फर्स्ट लुक

सुरैरय्या जान लेगी…

या आधी देखील कतरिना कैफचे या सिनेमातील सुरैय्या जान लेगी हे गाणं रिलीज करण्यात आले होते. पण या गाण्याचेही टीझरच रिलीज करण्यात आले. त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी हा नवा मार्केटींग फंडा वापरताना यशराज फिल्मज करत आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे मेकींग देखील रिलीज करण्यात आले.