Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Tiger3:सलमानला टक्कर देण्यासाठी इमरान हाशमी जिममध्ये गाळतोय घाम

Tiger3:सलमानला टक्कर देण्यासाठी इमरान हाशमी जिममध्ये गाळतोय घाम

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये सध्या भाईजान सलमान खानचा आगामी सिनेमा ‘टायगर3′ची भारीच चर्चा रंगत आहे. सिनेमात अभिनेता सलमान खान सोबतच कतरीना कैफ(Katrina Kaif) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांच्या मुख्य भूमिका असणार आहे. ‘टायगर3’ मध्ये सलमान आणि इमरानची एकमेकांना काँटे की टक्कर देतांना दिसणार आहे. सलमान सिनेमात भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे तर इमरान खलनायकाची भूमिका साकारणार आहे. यामुळे सलमान आणि इमरानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.अशातच अभिनेता इमारान हाशमी पहिल्यांदा सलमान खानसोबत एकत्र स्क्रिन शेअर करणार आसल्यामुळे इमारान त्याच्या भूमिकेवर प्रचंड मेहनत करतांना दिसत आहे. इमरानने सोशल मीडिया अकांउटवर ट्रेनिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इमरान हाशमीचा जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन लुक चाहत्यांना भारीच पसंत पडला आहे. इमरानने त्याच्या सोशल मीडिया अकांउटवर एक वर्कआउट लूक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा कट टिशर्ट परिधान केली आहे तसेच त्याने तोंडावर मास्क लावला आहे. त्याने एका हातात डंबल धरला आहे. इमरानच्या फोटोमध्ये त्याच्या बाइसेप्सवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये. चाहत्यांनी त्याच्या या फोटोला तुफान पसंती दर्शवली आहे. इमरानने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की ,JUST ANOTHER ARMS DAY !!

सध्या इमरानचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तर त्याला सलमान सोबत भिडण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या पुर्वीही इमरानचा वर्क आऊट फोटो व्हायरल झाला होता. इमरान सलमानला टक्कर देण्यासाठी सज्ज होत असल्याचे यावरुन दिसत आहे.

- Advertisement -

फोटो पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

- Advertisement -

कशी असणार इमरानची ‘टायगर 3’ मध्ये भूमिका –

पिंकविलाच्या सोर्स नुसार इमरान हाशमी एका पाकिस्तानी एजंटची भूमिका साकारणार आहे. इमरानचे कॅरेक्टर खूप स्मार्ट दाखवले जाणार आहे. त्याचा लुक आत्तापर्यंत निभावलेल्या नेगेटिव्ह शेड्स पेक्षा हटके आणि स्टायलिश असणार आहे.


हे हि वाचा –लग्नात रितेश आठवेळा माझ्या पाया पडला,जेनेलियाने सांगितला भन्नाट किस्सा

- Advertisement -