घरमनोरंजनTiger 3 : भाईजानला टक्कर देण्यासाठी इमरान हाशमी होतोय सज्ज !

Tiger 3 : भाईजानला टक्कर देण्यासाठी इमरान हाशमी होतोय सज्ज !

Subscribe

इमरान हाशमी एका पाकिस्तानी एजंटची भूमिका साकारणार आहे.

कोरोना व्हायरसचे संकट  कमी होतांना दिसत आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने काहीशा प्रमाणात निर्बंध शिथिल करत चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) टायगर 3 (Tiger 3) सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यापुर्वी ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger), ‘टायगर जिंदा है’ (Tiger Zinda Hai) या सिनेमाला चाहत्यांचा प्रचंड  प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफीसवर टायगर सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला होता. अता पुढील भाग देखील तितकाच धमाकेदार असणार आहे अशी माहिती समोर येत आहे. ‘टायगर3′ मध्ये अभिनेता सलमान खान सोबतच कतरीना कैफ(Katrina Kaif) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांच्या मुख्य भूमिका असणार आहे.’टायगर3’ मध्ये सलमान भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे तर इमरान खलनायकाची भूमिका साकारणार आहे. यामुळे सलमान आणि इमरानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.
अशातच अभिनेता इमारान हाशमी पहिल्यांदा सलमान खानसोबत एकत्र स्क्रिन शेअर करणार आसल्यामुळे इमारान त्याच्या भूमिकेवर प्रचंड मेहनत करतांना दिसत आहे. इमरानने सोशल मीडिया अकांउटवर ट्रेनिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इमरान खानचा जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन लुक चाहत्यांना भारीच पसंत पडला आहे. इमरानने फोटोमध्ये मास्क घातला आहे तसेच इमरान रिप्पड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटो शेयर करत इमरानने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, “फक्त सुरूवात झाली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

- Advertisement -

चाहत्यांनी इमरानच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच काही युजर्सने लिहले आहे की, टायगर 3 मध्ये तुम्हाला पाहण्यासाठी एक्साइडेट आहोत. तर एकाने लिहले , टायगर वर्सेस टायगर. एकंदरीतच इमरान भाईजान सलमान खानला टक्कर देण्यासाठी जय्यत तयारी करत असल्याचे दिसतेय.

कशी असणार इमरानची ‘टायगर 3’ मध्ये भूमिका –

पिंकविलाच्या सोर्स नुसार इमरान हाशमी एका पाकिस्तानी एजंटची भूमिका साकारणार आहे. इमरानचे कॅरेक्टर खूप स्मार्ट दाखवले जाणार आहे. त्याचा लुक आत्तापर्यंत निभावलेल्या नेगेटिव्ह शेड्स पेक्षा हटके आणि स्टायलिश असणार आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – Viral Video: स्टेजवर नाचतानाच खाली पडली सपना चौधरी !



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -