Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सलमान-कतरिना भेटले तुर्कीच्या पर्यटनमंत्र्यांना, 'टायगर ३'ची करतायत शूटिंग

सलमान-कतरिना भेटले तुर्कीच्या पर्यटनमंत्र्यांना, ‘टायगर ३’ची करतायत शूटिंग

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या आगामी चित्रपट ‘टायगर ३’ची शूटिंग करत आहे. शुक्रवारी सलमान-कतरिना तुर्कीचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री महमत अर्सोय यांना भेटले. या भेटी दरम्यानचे सलमान आणि कतरिनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुर्कीचे पर्यटन मंत्री महमत अर्सोय यांनी सलमान आणि कतरिनासोबत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी आपल्या देशात आहेत. तुर्की काही इंटरनॅशनल चित्रपटाचे प्रोजेक्ट्स होस्ट करत राहिला.’ फोटोमध्ये सलमान खानने ब्लॅक सूट घातला आहे. तर कतरिना कैफने बेज कलरचा टॉप आणि ब्लॅक पँट घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehmet Nuri Ersoy (@mehmetersoytr)

- Advertisement -

फोटोमध्ये सलमान खान तुर्कीचे पर्यटन मंत्री आणि डेलीगेट्सला भेटताना दिसत आहे. यावेळी तुर्कीतील चाहत्यांसोबत सलमान खान आणि कतरिनाने सेल्फी काढले. यापूर्वी दोघांनी रशियातील शूटिंग संपवले होते. तुर्कीमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग शूट होणार आहे. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लवकरच सलमान-कतरिनाच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

दरम्यान सलमान पुन्हा ‘टायगर ३’ चित्रपटामध्ये रॉ एजेंट अविनाश सिंह राठोड ही भूमिका साकारणार आहे. तर कतरिना कैफ जोयाचा व्यक्तिरेखेत दिसणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – #SidharthShukla: सिद्धार्थ खूप लवकर सोडून गेलास, नेहमी आठवणीत राहशील, सलमान खानचे भावनिक ट्वीट


- Advertisement -