घरमनोरंजनकाय सांगता ? ‘हिरोपंती २’चं पोस्टर केलं कॉपी !

काय सांगता ? ‘हिरोपंती २’चं पोस्टर केलं कॉपी !

Subscribe

टायगर श्रॉफला नेटिझन्सने ट्रोल केले आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा २ मार्चला नुकताच वाढदिवस झाला. त्याचा हा ३१वा वाढदिवस होता. त्याने वाढदिवसानिमित्त त्याच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे. टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती २’या चित्रपटाचे पोस्टर त्याने शेअर केले आहे. टायगरने पोस्टर शेअर करताच टायगर श्रॉफला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. कारण हे पोस्टर हॉलीवूडमधील एका चित्रपटाच्या पोस्टप्रमाणे कॉपी केले आहे असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. आतापर्यंत बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर हे हॉलीवूड चित्रपटाच्या पोस्टरशी मिळते-जुळते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

- Advertisement -

हे पोस्टर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिटमॅन’ या हॉलिवूड चित्रपटाचे कॉपी केले आहे. पोस्टर शेअर केल्यानंतर लगेच नेटिझन्सनी हे शोधून काढले. हल्ली कोणी काही पोस्ट केले की, नेटिझन्स त्या पोस्टला कशा पद्धतीने ट्रोल करता येईल यासाठी टपून बसलेले असतात.नेटिझन्सनी मीम्स तयार केल्या आणि टायगर श्रॉफला ट्रोल केले आहे. एकाने हिटमॅनचे पोस्टर शेअर करत, “हे दोन्ही पोस्टर सारखेच दिसत आहेत.”, तर दुसऱ्याने पोस्टर शेअर करत , “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिटमॅन”, अश्या कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -

टायगर श्रॉफ हिरोपंती २ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया दिसणार आहे. याशिवाय टायगर गणपतमध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत क्रिती सनॉन दिसणार आहे.


हेही वाचा – आतापर्यंत ‘या’ बॉलिवूड कलाकारांवर केलीय आयकर विभागाने कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -