Tiger Shroff चा ‘हीरोपंती 2’ चित्रपट लवकरच अॅमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारियाचा ‘हीरोपंती 2’ चित्रपट मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 7.5 करोडची कमाई केली , मात्र त्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारशी पसंती मिळाली नाही. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, चित्रपटगृहानंतर आता हा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 27 मे रोजी ‘हीरोपंती 2’ अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.

या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफने बबलू ही भूमिका साकारली आहे. जो सायबर क्राइमसोबत लढत आहे. या चित्रपटात त्याची टक्कर लैला नावाच्या एका मास्टरमाइंड सोबत होते. ही खलनायकाची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. तारा सुतारियाने चित्रपटात टायगरच्या प्रेमीकेची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटामुळे ‘हीरोपंती 2’ झाला फ्लॉप
टायगरचा ‘हीरोपंती 2’ रिलीज झाला त्याच काळात ‘केजीएफ’ चित्रपट सुद्धा रिलीज झाला होता. केजीएफ ने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडला सुद्धा मागे टाकलं आहे.

टायगर श्रॉफ आता येत्या काळात ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृति सेनन सुद्धा दिसणार आहे. टायगर आणि कृतिने ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण केलं होतं. शिवाय टायगर ‘बागी 2’ मध्ये दिसणार आहे.

 


 हेही वाचा :मुक्ता बर्वेच्या ‘वाय’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकाच्या भेटीला