घरमनोरंजनVideo : अण्णा- माईचे मजेदार TikTok व्हीडिओ व्हायरल!

Video : अण्णा- माईचे मजेदार TikTok व्हीडिओ व्हायरल!

Subscribe

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’, मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. जरी मालिकेत अण्णा आणि माई यांचं पटत नसलं तरी ऑफस्क्रीन दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि सेटवर सगळ्यांसोबत ते तितकीच धम्माल करताना दिसतात.

@rekhamane5♬ original sound – prajakta

@rekhamane5♬ Original Sound – Unknown
- Advertisement -

गेले काही दिवस अण्णा आणि माई यांचे सेटवरील काही टिकटॉक व्हिडिओज तुफान व्हायरल होत आहेत. या दोघांची धम्माल केमिस्ट्री पाहून नेटकरी देखील त्यांच्यावर फिदा झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओजना चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहेत.

@rekhamane5♬ original sound – hemangiikavi
- Advertisement -

जुन्या गाण्यांवरील अण्णा आणि माईंचे कमाल हावभाव या व्हिडिओजचे हायलाईट आहे. अण्णा आणि शेवंताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी कमाल आहे तितकीच अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडीओजची चर्चा सध्या होत आहे.

@rekhamane5♬ original sound – hemangiikavi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -