Video- लॉकडाऊनमध्ये बायकोपासून वाचण्यासाठी जाऊन बसला गाडीत…पण झालं भलतचं!

परिस्थिती कोणतीही असो त्या परिस्थितीवर टिकटॉक व्हीडिओ कोणी बनवला नाही असं शक्यच नाही. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. मात्र देशात लॉकडाऊन असं तरीही लोकांमधली कल्पकता कमी झाली नाही. लॉकडाऊनच्या काळातही लोकं भन्नाट टिकटॉक व्हीडिओ बनवत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे घरी असणाऱ्यांना ऑफिसच्या कामाबरोबरच घरची कामंही करायला लागत आहेत. घरातील बायका आपल्या नवऱ्यांना घरकाम सांगायची एक संधीही सोडत नाहीयेत. असाच एक टिकटॉक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

@jitendar199ऐसी बीवी ओर किस किस को परेशान करती है, लोकडौन का सबसे ज्यादा फायदा बीवियों को हुआ है ,♬ original sound – jitendar

आपल्या बायकोने काम सांगू नये म्हणून नवरा घराच्या बाहेर येऊन लपलाय. या व्हीडिओला टिकटॉकवर तुफान प्रतिसाद दिला आहे. या व्हीडिओओत नवरा आपल्या बायकोपासून वाचण्यासाठी गाडीत जावून बसलाय आणि गाडीला वरून कव्हर घातलं आहे.

@twistysteppersBiwi Ka Sataya hua Pati Chip K Baitha Hai##ArielShareTheLoad ##foryou ##viral ##new_trending ##husbandwife ##fyp ##upichalegachallenge ##gharbaithochallenge

♬ original sound – jitendar

 हा व्हीडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेल रोडवर उभ्या असलेल्या गाडीत नवरा बसला आहे. गाडीला वरून कव्हर घातलं आहे. पण तरीही बायको नवऱ्याला शोधून काढतेच आणि भांडी घासायला चल असं म्हणते. त्यांच्यातला हा संवाद सध्या तुफान गाजत आहे.


हे ही वाचा – ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिका दिसणार आता दूरदर्शनच्या नव्या चॅनेलवर!