लोकमान्य मालिकेच्या निमित्ताने टिळकांच्या १०० फुटी बँनरच अनावरण!

झी मराठीवर २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ‘लोकमान्य’ ही चरित्रगाथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, या मालिकेच्या निमित्ताने प्रसिद्धीसाठी १०० फुटी बँनरचं अनावरण करण्यात आलं, नवीन मालिका सुरू होते आहे, हे इंनोवेटिव्ह पद्धतीने, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झी मराठी ने १६ डिसेंबर ह्या दिवशी भिवंडीतील एका नावाजलेल्या एका फ्लाईंग रेस्टॉरंटमध्ये मालिकेच्या १०० फूट पोस्टरचे अनावरण केले.

झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असते, मग मालिकेद्वारे वेगळे विषय हाताळणे असो किंवा नवीन प्रयोग असो झी मराठी या प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे. मालिकांच्या लाँच आधी प्रेक्षकांसोबत भव्य प्रीमियर ही संकल्पना पण झी मराठीने सुरु केली.

लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९:३० वा. पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे भव्य पोस्टरचे अनावरण करून झी मराठीने आपले वेगळेपण कायम राखले.

 


हेही वाचा :

‘सरला एक कोटी’मध्ये ईशा केसकर मुख्य भूमिकेत!