घरमनोरंजनअक्षता अन् वऱ्हाडी, वाजंत्री! प्रथमेश- क्षितीजा अडकले लग्नबंधनात

अक्षता अन् वऱ्हाडी, वाजंत्री! प्रथमेश- क्षितीजा अडकले लग्नबंधनात

Subscribe

“मला वेड लागले प्रेमाचे…” म्हणत घराघरात पोहोचलेला दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब हा क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नबंधनात अडकला. 14 फेब्रुवारीला प्रथमेशचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता होती. अखेर क्षितीजा घोसाळकरशी आज प्रथमेशने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

प्रथमेश लग्नाचे फोटो केले शेअर

अभिनेता प्रथमेश परबने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” या लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही फार सुंदर दिसत असून खूप आनंदात पाहायला मिळत आहे. लग्नासाठी दोघांनी खास पारंपरिक लूक केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

- Advertisement -

प्रथमेश -क्षितीजाचा पारंपरिक लूक

लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. प्रथमेशच्या या लग्नाच्या पोस्टवर आता कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सायली संजीव, रवी जाधव यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश-क्षितीजाची लव्हस्टोरी

दरम्यान, प्रथमेश आणि क्षितीजाची ऑनलाइन ओळख झालेली. क्षितीजाचे काही फोटो पाहून प्रथमेशने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केलेला. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर झाले. प्रथमेश आणि क्षितीजाच्या आयुष्यात १४ फेब्रुवारी या तारखेला फार महत्व आहे. त्यांची भेट त्याच दिवशी झालेली. त्यानंतर दोघांनी याच दिवशी प्रेमाची कबुली दिली. यावर्षी त्यांच्या नात्याला ३ वर्ष पूर्ण झाली आणि त्याच दिवशी त्यांनी साखरपुडाही केला.

प्रथमेशची बायको कोण आहे?

प्रथमेशची होणारी बायको क्षितिज ही एक फॅशन मॉडेल आहे. यासोबतच ती एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि सोशल वर्करदेखील आहे. ती कोटक एज्युकेशन फाउंडेशनची ती सिनिअर कॉर्डीनेटर सुद्धा आहे. यासोबतच तिला लिखाणाची देखील आवड आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -