HomeमनोरंजनTina Datta : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार बिनलग्नाची आई, म्हणाली

Tina Datta : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार बिनलग्नाची आई, म्हणाली

Subscribe

प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘उतरन’ आणि ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री टीना दत्ता तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी एका वेगळ्या कारणामुळे ती चर्चेत आली आहे. वयाच्या 33व्या वर्षीसुद्धा टीना अविवाहित आहे. असे असले तरीही नुकतेच अभिनेत्रीने आई होण्याविषयी एक वक्तव्य केले आहे. जे प्रचंड चर्चेत आहे. टीनाने म्हटलंय भविष्यात मी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेऊ शकते. अभिनेत्रीने असे का म्हटले? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Tina Datta wants to be a single mother statement goes viral)

मी एक चांगली आई होईन

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने सिंगल मदर असणाऱ्या महिलांचे कौतुक करत स्वतः आई होण्याविषयी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे. अद्याप तिने सिंगल मदर व्हायचं नक्की ठरवलेलं नाही मात्र सरोगसी किंवा मूल दत्तक घेण्याचा पर्याय निवदेन असे म्हटले. याविषयी बोलताना अभिनेत्रीने सांगितले, ‘मला वाटतं की मी एक चांगली आई होईन. मी सिंगल मदर व्हायचा प्लॅन केला नसला तरीही मी दत्तक किंवा सरोगसीच्या पर्यायातून आहे होणे पसंत करेन. भविष्यात नक्कीच मी या पर्यायांचा विचार करू शकते’.

पतीवर अवलंबून राहायची गरज नाही

पुढे सिंगल मदर्सचे कौतुक करताना तिने सुश्मिता सेनचे नाव घेतले आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला सुश्मिता सेनसारख्या महिलांचं खूप कौतुक वाटतं. तिने दोन सुंदर मुलींना दत्तक घेतलं आहे. माझे आई आणि वडील एका छोट्या शहरातून आहेत आणि मी बंगाली आहे. असे असूनदेखील ते दोघेही प्रगत विचारांचे आहेत. त्यामुळे मी मूल दत्तक घ्यायचे ठरवले किंवा सरोगसीचा पर्याय निवडला तर ते मला नक्कीच पाठिंबा देतील. यात मला असं वाटतं मी स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेते, तर मी माझ्या मुलाचीही चांगली काळजी घेऊ शकते. यासाठी मला पतीवर अवलंबून राहायची गरज नाही’.

आमच्या आयुष्यावर खूप लक्ष ठेवतात

अभिनेत्रीने पुढे म्हटले, ‘समाजात बरेच बदल होत आहेत. त्यामुळे आजकाल सगळे या गोष्टी स्वीकारताना दिसतात. पण आम्ही मालिका विश्वात (शो बिझनेस) कार्यरत असल्याने आमच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप लक्ष ठेवले जाते. त्यामुळे मनोरंजनविश्व रोज नवे बदल घडवून आणत असल्याचे बरेच लोक म्हणतात. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी मुलं दत्तक घेतली आहेत, पण ते इंडस्ट्रीमध्ये नाहीत. परिणामी त्यांच्या बातम्या होत नाहीत. पण इंडस्ट्रीतील गोष्टींबाबत काही प्रमाणात अतिशयोक्ती केली जाते. कारण, आम्ही जे करतो ते सार्वजनिक होतं’.

अभिनेत्री टीना दत्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिची ‘पर्सनल ट्रेनर’ ही सीरिज 23 जानेवारी 2025 रोजी हंगामावर रिलीज झाली आहे. ही सिरीज मुंबईतील जिम कल्चर बेस्ड क्राइम थ्रिलर ड्रामा आहे. याबाबत बोलताना टीनाने सांगितले, ‘या सिरीजची कथा खूपच आकर्षक होती. त्यात ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे आणि अशा कोणत्याच प्रोजेक्ट साठी मी याआधी काम केलं नव्हतं. शिवाय या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन माझा मित्र अमित खन्नाने केलंय. ज्याने ‘सेक्शन 365’ आणि ‘366’सारख्या शोसाठी काम केलंय. त्यामुळे हा प्रोजेक्ट दमदार असणार याची मला कल्पना होती. अर्थात म्हणूनच मी यात काम करायला होकार दिला’.

हेही पहा –

Priya Bapat : चाळीतलं बालपण ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी वर्सटाईल प्रिया