घर मनोरंजन मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या Big b च्या मदतीला आला बाईकस्वार

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या Big b च्या मदतीला आला बाईकस्वार

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये खूप सक्रिय आहेत. या वयातही अमिताभ बच्चन अनेक चित्रपटांमध्ये काम करतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही तितकेच खूप सक्रिय असून आपल्या चाहत्यांशी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक नवनवीन अपडेट्स शेअर करतात. अशातच अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट चर्चेत आहे. ज्यात ते एका व्यक्तीसोबत बाईकवर बसलेले दिसत आहेत. खरंतर, मुंबईच्या ट्रॅफिकमुळे वेळेवर शूटिंग सेटवर पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या चाहत्याकडून लिफ्ट मागितली. अमिताभ यांनी ही संपूर्ण घटना इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ नेहमीच आपल्या आयुष्यातील लहान-मोठ्या गोष्टी सोशल मीडियावरद्वारे चाहत्यांना शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते एका व्यक्तीसोबत बाईकवरुन प्रवास करताना दिसत आहेत. या फोटोखाली त्यांनी लिहिलंय की, “या राइडसाठी धन्यवाद भाऊ, मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही माझं ऐकलं आणि मला कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचवलं. या ट्रॉफिक जामपासून वाचण्यासाठी धन्यवाद यलो टी-शर्ट आणि शॉर्ट्सचे मालक”

अमिताभ यांच्या पोस्टला नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
- Advertisement -

अमिताभ यांच्या पोस्टला अनेकजण कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “हा व्यक्ती किती नशीबवान आहे”, सर तुम्ही पुढच्या वेळी कुठे जाणार आहात? मी माझी स्कुटी घेऊन येईन” तर दुसऱ्याने लिहिलंय की, हा जो गाडी चालवत आहे. त्यांच्या मुलांकडे आयुष्यभरासाठी सांगायला एक गोष्ट असेल. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलंय की, “सर हेलमेट तरी घालायचं” अशा प्रकारे नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी ट्रॉफिकमुळे अभिनेत्री हेमा मालिनीने देखील मुंबई मेट्रोने प्रवास केला होता. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

 


- Advertisement -

हेही वाचा :

अदा शर्माचा अपघात; ट्वीट शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

- Advertisment -