Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी नुसरत जहाँ होणार आई, पण याबाबत पतीला नाही माहित; भाजप नेत्याला करतेय...

नुसरत जहाँ होणार आई, पण याबाबत पतीला नाही माहित; भाजप नेत्याला करतेय डेट

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) नेहमी कोणकोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी बोल्ड फोटोमुळे तर कधी वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. निखिल जैनसोबत दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे देखील नुसरत जहाँची चर्चा खूपच रंगली होती. पण आता पुन्हा एकदा नुसरत चर्चेत आली आहे. नुसरत सहा महिन्यांची गर्भवती (Nusrat Jahan Pregnant) असल्याचे समोर आले आहे. याबाबत नुसरतचा पती निखिल जैन (Nikhil Jain)ला कोणतीही माहिती नाही आहे. तसेच नुसरत आणि निखिल विवाहबंधनातून तुडण्याच्या मार्गावर असल्याचा दावा सध्या करण्यात आला आहे.

माध्यमांच्या अनेक रिपोर्टनुसार नुसरत आई होणार असल्याचे समोर आले आहे. पण नुसरत किंवा तिच्या टीमने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. मात्र सोशल मीडियावर याबाबत खूपच चर्चा रंगली आहे. काही बंगाली वृत्तात सांगितले की, नुसरत गर्भवती असल्याबाबत पती निखिल जैनला काहीच माहित नाही आहे.

निखिलने हे बाळ नाकारले?

- Advertisement -

एबीपी आनंदच्या वृत्तानुसार निखिल जैन म्हणाला की, त्यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. गेल्या ६ महिन्यांपासून निखिल नुसरतसोबत राहत नाही आहे आणि अशात नुसरत गर्भवती आहे तर ते बाळ निखिलने आपले मानण्यास नकार दिला आहे. निखिल पुढे म्हणाला की, बऱ्याच काळापासून नुसरत आणि त्याच्यात संपर्क झाला नाही आहे.

भाजप नेता यश दासगुप्तासोबत डेटची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून नुसरत जहाँ बंगाली अभिनेता आणि भाजप नेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये (Nusrat Jahan Yash Dasgupta Relationship) आहे. दोघे अनेकांदा एकत्र दिसले आहेत आणि यावर्षी दोघांनी न्यू इअर एकत्र राजस्थानमध्ये साजरा केला होता. पण अद्याप याबाबत नुसरत व्यतिरिक्त निखिल किंवा यश दासगुप्ताचे वक्तव्य आले नाही आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, नुसरत जहाँचे लग्न व्यावसायिक निखिल जैनसोबत १९ जून २०१९मध्ये झाले होते. नुसरत आणि निखिलचे लग्न हिंदू, इस्लाम आणि ईसाई रूढी परंपरेनुसार झाली होती. लग्नानंतर नुसरत जहाँने सिंदूर लावल्यामुळे आणि दुर्गा देवीच्या पूजेत सामील झाल्यामुळे मुस्लिम कट्टरपंथियांनी तिच्यावर सडेतोड टीका केली होती. ज्याला नुसरतने जबरदस्त उत्तर दिले होते.

- Advertisement -