Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन TMKC:अभिनेता राजपाल यादवने 'जेठालाल'ची भूमिका साकारण्यास दिला होता नकार!

TMKC:अभिनेता राजपाल यादवने ‘जेठालाल’ची भूमिका साकारण्यास दिला होता नकार!

मला एकाच भूमिकेत अडकून राहायचं नव्हतं. मालिका वर्षानुवर्ष चालतात.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांची सर्वाधिक आवडती मालिका ठरली आहे. मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या भागात समाजात एक महत्वपुर्ण संदेश दिला जात असून प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. तसेच या मालिकेत अभिनेता दिलीप जोशी जेठालालची भूमिका गेल्या अनेक वर्षापासून उत्तमरित्या साकारत आहे. 2008 सालापासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली असून लोकांचे मनोरंजन करत आहे.  नुकतच सोशल मीडियावर तसेच माध्यमावर जेठालालच्या भूमिकेसाठी सुरूवातीला अभिनेता राजपाल यादव यांची निवड करण्यात आली होती अशी माहिती समोर येत आहे. तसेच राजपाल यादव यांनी भूमिका साकारण्यास नकार दिल्याचे एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. रेडियो होस्ट सिद्धार्थ कन्नन यांनी मुलाखती दरम्यान राजपाल यादव यांना प्रश्न विचारला की तुम्हाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्याचा कधी पश्चाताप झाला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देत राजपाल यादव म्हणाले, “आजिबात नाही,जेठालालच्या भूमिकेची ओळख एका उत्तम कलाकाराने केली आहे. आणि मी प्रत्येक भूमिकेला एखाद्या कलाकाराचेचं पात्र आहे असे समजतो.आम्ही सर्व मनोरंजनाच्या मार्केटमध्ये काम करत आहोत. माझ्या मते कोणत्याही कलाकाराच्या भूमिकेला माझ्या भूमिकेत पाहत नाही. यामुळे मला असे वाटते कोणतेही पात्र माझ्यासाठी तयार झाले पाहिजे मी चांगल्या प्रकारे ती भूमिका निभावेल. पण इतर कोणात्याही व्यक्तीची भूमिका ज्याने इतकी वर्षे उत्तम साकारली आहे. ते कधीच माझ्या वाटेला येऊ नये.”(TMKC: Actor Rajpal Yadav had refused to play the role of ‘Jethalal’!)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony SAB (@sonysab)

- Advertisement -

तसेच राजपाल यादव यांनी जेठलालच्या भूमिकेस नकार का दिला याबाबत देखील स्पष्टीकरण दिलं आहे.” मला एकाच भूमिकेत अडकून राहायचं नव्हतं. मालिका वर्षानुवर्ष चालतात. अन् इतका काळ एकाच प्रोजेक्टमध्ये गुंतून राहाणं हे माझ्यासाठी अशक्य आहे. शिवाय त्या काळात माझ्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील होत्या. त्यामुळे मी जेठालाल साकारण्यास नकार दिला.”

 

- Advertisement -

राजपाल यादव यांच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास राजपाल यांनी ‘हंगामा’ ‘मालामाल वीकली’, ‘चुप चुप के’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’, ‘मैने प्यार क्यूं किया’ , ‘भूल भुलैया’ सारख्या चित्रपटात कॉमेडी भूमिका साकारली आहे.


हे हि वाचा – Indian idol: ग्रँड फिनाले पुर्वीच आदित्य नारायणने घेतला होस्टिंग सोडण्याचा निर्णय

- Advertisement -