Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन TMKOC : ...म्हणून मी गप्प होते; जेनिफर मिस्त्रींनी नवा व्हिडीओ शेअर करत...

TMKOC : …म्हणून मी गप्प होते; जेनिफर मिस्त्रींनी नवा व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Subscribe

असित मोदी माझ्यावर अनेक लैंगिंक टिप्पणी करायचे. पूर्वी मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण आता माल हे सहन होत नाही, असं जेनिफरने म्हटले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन भाभी ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, निर्माता असित कुमार मोदी आणि काही क्रू मेंबर्सनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. निर्मात्यांवर आरोप करत अभिनेत्रीने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आता लैंगिक छळ प्रकरणी मुंबई पोलिसांचे वक्तव्य समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी अभिनेत्रीची तक्रार नोंदवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचेही सांगितले आहे. ( TMKOC so I was silent Jennifer Mistry revealed by sharing a new video allegation on Asit Modi  )

काय म्हणाल्या जेनिफर ?

चुप्पी को मेरी कमजोरी मत समझ, मै चुप थी क्योंकि सलीका है मुझमे. खुदा गवाह है कि सच क्या है. याद रख, उसके घर में को फर्क नहीं तुझमें या मुझसे. अशी एक शायरी ती या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. यात ती फारच रागात पाहायला मिळत आहे. जेनिफरने या व्हिडीओला क‌ॅप्शन देताना, सत्य बाहेर येईल, न्यायाचा विजय होईल, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

असित मोदीने अनेकदा माझ्याबद्दल लैंगिक टिप्पणी केली आहे. एकदा तर त्यांनी सर्वांसमोर माझ्यावर लैंगिक टिप्पणी करत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथे असलेल्या सहकलाकारांनी या गोष्टी सांभाळून घेतल्या होत्या. एकदा त्याने मला सेक्सी म्हटलं होतं आणि माझे गालही ओढले होते. असित मोदी माझ्यावर अनेक लैंगिंक टिप्पणी करायचे. पूर्वी मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण आता माल हे सहन होत नाही, असं जेनिफरने म्हटले होते.

( हेही वाचा: प्रियंका चोप्राने शेअर केला मालती मेरीचा नवा लूक )

असित मोदींची प्रतिक्रिया समोर

- Advertisement -

लैंगिक छळाच्या आरोपांबाबत असित मोदींचे वक्तव्यानेही समोर आले आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करू, असे ते म्हणाले. ती माझी आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तिची सेवा बंद केली आहे, त्यामुळे ती बिनबुडाचे आरोप करत आहे.

याशिवाय शोमध्ये आत्माराम भिडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चंदावरकर यानेही अभिनेत्रीने निर्मात्यांवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तिने असे का केले हे मला माहीत नाही, असे तो म्हणाला. त्यांच्यात काय आहे हे मलाही माहीत नाही.

 

- Advertisment -