Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी मराठमोळ्या कलाकारांनी कसली कंबर,लोकांना केलं मदतीसाठी आवाहन

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी मराठमोळ्या कलाकारांनी कसली कंबर,लोकांना केलं मदतीसाठी आवाहन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने तिझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्लाझ्मा दानासाठी आवाहन केलं आहे

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता  देशामध्ये पुन्हा एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत नियम व अटी लागू करून फक्त अत्यावशक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशातच अनेक मराठमोळ्या कलाकारांनी कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याठी आता कंबर कसली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्लाझ्मा दानासाठी आवाहन केलं आहे. ”स्त्रियांमध्ये HB कमी असल्यामुळे,आणि बाळंतीण झाल्यानंतर प्लाझ्मादान करता येत नाही म्हणून, इतर महिलांनी ही अवश्य पुढे यावं” आशी विनंती सोनालीने सगळ्यांना केली आहे.

- Advertisement -

सोनाली व्यतिरिक्त सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने सुद्धा आपले सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही दिवसांसाठी फक्त करोना व्हायरस संबंधित गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे घोषित केलं आहे. यावर फक्त लोकांच्या मदतीसाठी तसेच जगरूकतेसाठी काही पोस्ट करण्यात येणार आहे. त्याच्या व्यक्तीगत किंवा मनोरंजन क्षेत्राशी निगडीत कोणत्याही प्रकारच्या घडामोडी तो यादरम्यान पोस्ट करणार नाही अशी माहिती स्वप्नीलने दिली आहे. तसेच स्वप्नीलने या लढ्यात प्रत्येकाला सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती  अत्यंत बिकट आहे सगळ्यांनी एकत्र येऊन याचा सामना करूया असा संदेश त्याने दिला आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – मालदीव व्हॅकेशनला गेलेल्या सेलेब्रिटींवर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने साधला निशाणा, म्हणाला…

- Advertisement -