घरमनोरंजनजावेद जाफरी करायचा वडीलांचा तिरस्कार

जावेद जाफरी करायचा वडीलांचा तिरस्कार

Subscribe

बॉलीवूडचा विनोदी अभिनेता जावेद जाफरी याचा आज ५५ वा वाढदिवस असून त्यांनी आज आपल्या आयुष्यातील एक गुपित उघड केले आहे.

बॉलीवूडमधील कॉमेडीचा बादशाह म्हणून स्वत:ची वेगळी ओळक निर्माण करणारा अभिनेता जावेद जाफरी आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. जावेद जाफरी हा प्रसिद्ध अभिनेते असून जगदीप जाफरी यांचा मुलगा आहे. जावेद जाफरी केवळ अभिनेता, कॉमेडीयनच नाही तर एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. याशिवाय जावेद सिंगर, कोरिओग्राफी आणि जाहिरात निर्माता म्हणून देखील प्रसिद्ध आहे. जावेदने आता पर्यंत अनेक चित्रपट केले असून त्यांनी उत्तम अभिनय देखील केले आहेत.


वाचा – यापुढे रस्त्यांवर वाढदिवस साजरा करण्यास बंदी!

- Advertisement -

‘मेरी जंग’ या सिनेमाने केली करियरला सुरुवात

जावेद यांनी बॉलिवूडमध्ये सर्वप्रथम खलनायक म्हणून पदार्पण केले. त्यांनी १९८५ मध्ये ‘मेरी जंग’ या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमात जावेदने नकारात्मक भूमिका साकारली असून त्यामुळे त्या लोकांची अधिक पसंती मिळाली होती. त्यानंतर जावेद अनेक हिट सिनेमांमध्ये झळकला होता. त्यानंतर जावेदने सलाम नमस्ते, ता रा रम पम, फायर, अर्थ, थ्री इडियटस अशा अनेक हिट सिनेमांमध्ये जावेद चांगला गाजला आहे. त्यानंतर जावेद यांनी त्यांचा भाऊ नावेदसह ‘बुगी वुगी’ या डान्स शोचे परीक्षण केले होते. तर १९९६ साली सोनी एन्टरटेन्मेंट वाह्नीवर सुरु झाला होती. हा शो खूपच लोकप्रिय ठरला आहे.

यामुळे करायचा तो वडीलांचा तिरस्कार

जावेदचे वडील जगदीप जाफरी यांनी आपल्या मुलाला एकही सिनेमाची निर्मिती केली नाही. तसेच आपल्या मुलांने आपल्या बळावर स्वत:चे स्थान निर्माण करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींचा सामना करुन यश संपादन केले. मात्र नंतर जावेद आपल्या वडीलांचा तिरस्कार करु लागला होता. त्याचे फारसे आपल्या वडीलांशी पटत नव्हते. जावेदचे वडील दारु आणि जुगाराचे व्यसन करायचे. हे जावेदला पसंत नसल्याने त्याचे आपल्या वडीलांशी पटत नव्हते. वडीलांच्या व्यसनामुळे मुलगा आणि वडीलांमध्ये दुरावा निर्माण झाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -