Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी KGF स्टार यशच्या चाहत्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अभिनेत्याचा उल्लेख

KGF स्टार यशच्या चाहत्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अभिनेत्याचा उल्लेख

दक्षिणात्या अभिनेता यश याच्या चाहत्याने आत्महत्या केली असून, सुसाइट नोटमध्ये त्याने अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच त्याने त्याच्या शेवट्च्या दोन इच्छा या चिठ्ठीत लिहिल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

प्रत्येक चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटींसाठी त्यांच्या चाहत्यांचं प्रेम तर नेहमीच पाहायला मिळतं. काहीवेळा हे चाहते त्यांच्या कलाकारांसाठी समस्या देखील निर्माण करतात. पण केजीएफ स्टार यशच्या एका चाहत्याने मात्र कहरच केला आहे. दक्षिणात्य अभिनेता यशच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइट नोटमध्ये अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख केला आहे. कर्नाटक येथील मांड्या जिल्यात राहणाऱ्या या चाहत्याचे नाव रामकृष्ण(वय २५) आहे. या चाहत्याने गळपास लावून आत्महत्या केली आहे.

रामकृष्ण याने आत्महत्ये पूर्वी कन्नडमध्ये एक चिठ्ठी लिहिली आहे. ज्यात त्याने त्याच्या दोन शेवटच्या इच्छा सांगितल्या आहेत. चिठ्ठीमध्ये त्याने तो अभिनेता यश आणि कर्नाटकचे विरोधी पक्ष नेते सिध्दारमैय्या यांचा खूप मोठा चाहता आहे, आणि या दोघांनीही त्याच्या अंतिम संस्कारांना उपस्थित राहावं, अशी रामकृष्ण याने त्याच्या सुसाइट नोटमध्ये शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. रामकृष्णने त्याच्या या चिठ्ठीमध्ये आपण आपल्या जीवनात अयशस्वी झाल्याचं म्हणलं आहे. त्याच्या मते, तो आपल्या आईसाठी एक चांगला मुलगा बनु शकला नाही, तर प्रेमातही तो अयशस्वी ठरला. त्यामुळे आयुष्यात मिळवण्यासाठी आता त्याच्याकडे कोणतीही अशी गोष्ट उरली नाही आहे. म्हणूनच त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते सिद्धारमैय्या कोडिदोड्डी रामकृष्णच्या अंतिम संस्काराच्या विधीमध्ये सहभागी झाले. त्यांनी त्याच्या आत्महत्येसंबंधी एक ट्वीट केले व त्यात, ‘मी त्याला कधीही भेटलो होतो का? हे मला माहित नाही, पण आपल्या चाहत्याला अशाप्रकारे भेटणं खूप दुःखद आहे. कोणीच एवढ्या कमी वयात आपलं आयुष्य संपवणं चुकीचं आहे.’ अशा प्रकारे आपले दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय यशने सुद्धा या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त करताना एक ट्विट केले आहे. ‘आम्ही कलाकार तुमच्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज ऐकतो. तुम्ही आम्हाला जे प्रेम देता त्यासाठी आम्ही जगत असतो. पण मी माझ्या चाहत्याकडून ही अपेक्षा कधीच केली नव्हती.’ अशा प्रकारचे ट्विट यशने शेअर केले आहे.

- Advertisement -