घरमनोरंजनmission impossible 7: शूटींगदरम्यान टॉम क्रूजच्या BMW कारची झाली चोरी

mission impossible 7: शूटींगदरम्यान टॉम क्रूजच्या BMW कारची झाली चोरी

Subscribe

टॉम क्रूजच्या कारमध्ये इलेक्टॉर्निक ट्रॅकिंग डिवाईस असल्याने कार शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र कारमध्ये असलेल्या महत्वपूर्ण वस्तू चोरीला गेले असल्याची माहिती समोर येत आहे.

हॉलिवूड (Hollywood) अभिनेता टॉम क्रूज(Tom Cruise) सध्या आगामी बहूचर्चित चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल’ च्या 7 व्या (Mission impossible 7)भागाच्या चित्रीकरणात सध्या कमालीचा व्यस्त आहे. पण शूटिंग दरम्यान त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. ‘याचदरम्यान टॉम क्रूज यांची लग्जरी कार चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. सुत्राने ‘द सन’ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, बमिर्ंघम या ठिकाणी टॉम क्रूजच्या कारला चोर घेऊन गेले. यानंतर पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी वेगवान तपास करत चोरांचा शोध सुरू केला आहे. माहितीनुसार टॉम क्रूजच्या कारमध्ये इलेक्टॉनिक ट्रॅकिंग डिवाईस असल्याने कार शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र कारमध्ये असलेल्या महत्वपूर्ण वस्तू चोरीला गेले असल्याची माहिती समोर येत आहे. टॉम क्रूजच्या सिक्योरीटी टीमसाठी ही एक अत्यंत लज्जास्पद घटना होती.(Tom Cruise’s BMW Stolen During Filming Of Mission impossible 7)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tom Cruise (@tomcruise)

- Advertisement -

चोरांनी कारला खोलण्यासाठी कीलेस इंग्निशने सिग्नलला क्लोन करुन कार चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती देत म्हटले आहे की, आम्हाला मंगळवारी कार चोरी झाल्याची माहिती मिळाली, सकाळी बर्मिंघममधील चर्च स्ट्रीच परिसरातून एक BMW X7 कार चोरी झाली आहे. कारला काही वेळापूर्वी स्मेथविकमधून रिकवर करण्यात आलं आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरांचा शोध लावण्यात येत आहे.


हे हि वाचा – कॅमेरा हाती घेत लेकिने सांभाळली वडिलांची जागा, ‘होम मिनिस्टर’ची टीम भावूक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -