घरमनोरंजनपोट धरुन हसवेल 'टोटल धमाल'चा Trailer

पोट धरुन हसवेल ‘टोटल धमाल’चा Trailer

Subscribe

'चित्रपटातील पात्रांची ५० कोटी रुपयांसाठी चाललेली धडपड आणि त्यादरम्यान होणारी त्यांची फजिती' याची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दिक्षीत, जावेद जाफरी, रितेश देशमुख, अर्शद वारसी, महेश मांजरेकर, संजय मिश्रा आणि पीतोबाश अश्या एक से एक कलाकारांची तगडी टीम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नुकताच ‘टोटल धमाल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, युट्यूबसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्याचाच बोलबाला आहे. ‘टोटल धमाल’ चित्रपटाचा ट्रेलर नावाप्रमाणेच धमाल आहे. ट्रेलरमधील तुफान कॉमेडीवर देशभरातील चाहते फिदा झाल्याचं, सोशल मीडियावरील कॉमेंट्सवरुन लक्षात येत आहे. प्रदर्शनानंतर काही तासातच ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘चित्रपटातील पात्रांची ५० कोटी रुपयांसाठी चाललेली धडपड आणि त्यादरम्यान होणारी त्यांची फजिती’ याची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

‘टोटल धमाल हा चित्रपट कॉमेडी आणि अॅक्शनची जबरदस्त जुगलबंदी आहे’, असं मत चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी यापूर्वीच व्यक्त केलं होतं. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना आपल्यला त्याचा अंदाज येतो. काही दिवसांपूर्वीच टोटल धमाल चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं होतं. या पोस्टरमध्ये अभिनेता अजय देवगणच्या खांद्यावर एक माकडीण बसलेली दिसते आहे. ही माकडीण साधीसुधी माकडीण नसून, हॉलीवूडची ‘स्टार’ माकडीण आहे. ‘क्रिस्टल’ असं या माकडीणीचं नाव असून, तिने हॉलीवूडच्या ‘हँगओव्हर-२’, ‘जॉर्ज ऑफ द जंगल’ आणि ‘नाईट अॅट द म्यूझिअम’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘टोटल धमाल’मधून क्रिस्टल बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

- Advertisement -

इंद्रा कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या २२ फेब्रुवारीला देशभरात रिलीज होणार आहे. चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्याच सुपस्टार्सचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असणार यात काहीच शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -