नवी मुंबईमध्ये पार पडला ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

कोरोना महामारीनंतर, संपूर्ण भारतातील चित्रपटगृह मोठ्या पडद्यावर परतणाऱ्या चित्रपटांचा आनंद घेत आहेत. नेक्सस मॉल्स हे त्याच्या जागतिक दर्जाच्या खरेदी, मनोरंजन आणि उत्तम खाद्यपदार्थांच्या अनुभवांसाठी ओळखले जातात, नुकतेच ‘जुग जुग जियो’चे ट्रेलर लॉन्च झाले असून अभिनेता वरुण धवन, अनिल कपूर, अभिनेत्री कियारा अडवाणी आणि नीतू सिंग यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘जुगजुग जीयो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून सोशल मीडियावर त्याची खळबळ उडाली.

‘जुगजुग जीयो’च्या टीमने त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली असून चाहत्यांनी त्यांच्या संपुर्ण टिमला शुभेच्छाही दिल्या. संपूर्ण टीम आणि इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांना भेटण्यासाठी चाहते उत्सुक होते.

‘जुगजुग जीयो’ हा राज मेहता दिग्दर्शित आणि यश जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित एक भारतीय विनोदी-नाटक चित्रपट आहे. धर्मा प्रॉडक्शनचा बहुप्रतिक्षित चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पिरेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. कारण व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत आहे आणि लोकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये बॉलीवूडची जादू अनुभवायची आहे. हे ॲमेझोन प्राईम सह ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे.

 


हेही वाचा :जस्टिन बिबर करणार भारतात परफॉर्मन्स; ‘या’ दिवशी होणार कॉन्सर्ट