सत्य घटनेवर आधारित ‘२०० हल्ला हो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, रिंकू राजगुरु झळकणार प्रमुख भूमिकेत

झी५ अॅप ने ‘२०० हल्ला हो’ या आपल्या नव्या चित्रपटाचा ५ऑगस्टला ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, या हिंदी चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘रिंकू राजगुरु’, ‘उपेंद्र लिमये’ हे चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्याच बरोबर ‘अमोल पालेकर’, ‘बरुण सोबती’ हे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांनी चित्रपटामध्ये दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य केले आहे. ज्यां महिलां त्यांच्यावर होण्याऱ्या अत्याचाराला क्रूरपणे सामोरे जात आहेत. समाजात छेडछाड, त्रास आणि अपमान सहन करत आहेत. त्याच महिलां आता त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास एकत्र आणले आहे. आणि अत्याचार करणाऱ्या संबंधित व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी स्त्रियांनी कायदा आपल्या हातात घेतला.

जवळपास एक दशका नंतर अमोल पालेकरांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी एका सेवानिवृत्त झालेल्या न्यायाधीशाची भूमिका केली आहे. चित्रपटात साहिल खट्टर याची भूमिका अचंबित करणारी आहे. या चित्रपटा दरम्यान त्याने एक विधान केले होते कि, या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी त्याला मोठी सुट्टी घ्यावी लागली होती.

५ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा ट्रेलर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करत आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.