Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; चाहत्यांनी केलं कौतुक

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; चाहत्यांनी केलं कौतुक

Subscribe

‘दृश्यम 2’च्या जबरदस्त यशानंतर चाहते अजय देवगणच्या ‘भोला’च्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि व्हीएफएक्सने प्रेक्षकांना आधीपासूनच आकर्षित केले आहे. अशातच आता या चित्रपटाचा थ्रिलर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्या क्षणार्धात अधिक व्ह्यूज मिळत असून चाहते ट्रेलरचं कौतुक करताना दिसत आहेत.

भोला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

गेल्या अनेक दिवसांपासून भोलाच्या ट्रेलर रिलीजची तयारी सुरू होती. अजय देवगणने गेल्या आठवड्यातच ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली होती. आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये अजय देवगण कैद्याच्या तर तब्बू पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘दृश्यम 2’ ही जोडी पुन्हा एकदा जबरदस्त धमाका करणार आहे. ‘दृश्यम 2’ प्रमाणेच अजयचा भोला चित्रपटदेखील एका टॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. भोलाची कथा साऊथच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कार्ती’ मधून साकारली आहे.

भोलाची तगडी स्टारकास्ट

- Advertisement -

भोलाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, तब्बू पुन्हा एकदा अजय देवगणसोबत या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय दीपक डोबरियाल आणि शरद केळकर यांसारख्या कलाकारांच्या भूमिका देखील या चित्रपटात आहेत. या चित्रपटात तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, तर दीपक डोबरियाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजयने घेतली दिग्दर्शनाची जबाबदारी

भोलामध्ये अभिनयासोबतच अजयने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्याच्या दिग्दर्शनात बनलेला हा चौथा चित्रपट आहे, याआधी अजयने यू मी और हम, शिवाय, रनवे 34 सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘सर्किट’ चित्रपटासाठी वैभव तत्त्ववादीचं बॉडीबिल्डिंग

- Advertisment -