घरमनोरंजनमधुर भंडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाउन’चे ट्रेलर प्रदर्शित

मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाउन’चे ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

भारतातील सर्वांत मोठ्या होम-ग्रोन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने आपली नवीन ओरिजिनल फिल्म ‘इंडिया लॉकडाउन’चे ट्रेलर प्रदर्शित केले आहे. मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेली ही डायरेक्ट-टू-डिजिटिल (थेट डिजिटल माध्यमांद्वारे प्रदर्शित होणारी) फिल्म कोविड साथ व भारतातील लोकांवर झालेल्या तिचे परिणाम या विषयावरील भारतातील पहिली फिल्म आहे. अमित जोशी व आराधना साह यांनी मधुर भंडारकर यांच्यासह या फिल्मचे लेखन केले आहे. या ZEE5 ओरिजिनल फिल्ममध्ये श्वेता बसु प्रसाद, आहाना कुमरा, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर आणि प्रकाश बेलावडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर हृषिता भट कॅमिओमध्ये दिसणार आहे.

पेन स्टुडिओजचे डॉ. जयंतीलाल गाडा, मधुर भंडारकर यांची कंपनी भंडारकर एण्टरटेनमेंट्स आणि प्रणव जैन यांच्या पीजे मोशन्स पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या ‘इंडिया लॉकडाउन’चा जागतिक प्रीमियर IFFI गोवा येथे 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर डिजिटल प्रीमियर ZEE5वर 2 डिसेंबर रोजी होणार आहे. 2021 मध्ये चित्रित झालेल्या या फिल्ममध्ये भिन्न व्यक्तिरेखांच्या चार समांतर कथा सांगितल्या आहेत. या व्यक्तिरेखा कोरोना साथीत लावल्या गेलेल्या लॉकडाउनमुळे आकस्मिक नाट्यमय स्थितीत सापडल्या आहेत.

- Advertisement -

ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, श्वेता बसु प्रसाद मेहरुन्निसा या मुंबईतील कामाठीपुऱ्यातील एक सेक्स वर्कर स्त्रीच्या भूमिकेत आहेत. लॉकडाउनमुळे लादले गेलेले बदल तिला स्वीकारावे लागतात आणि आपला व्यवसाय ऑनलाइ करण्यासारख्या नव्या मार्गांचे प्रयोग करून बघणे भाग पडते. आहाना कुमरा मून आल्व्ह्ज या वैमानिकाच्या भूमिकेत आहे.

या व्यक्तिरेखेला आकाशात उंचच उंच भराऱ्या घेण्याची सवय लागलेली असते, आणि अचानक अनेक महिने तिला जमिनीवरच राहणे भाग पडते. प्रथमच तिला आपले पंख कापले गेल्याची जाणीव होते. प्रतीक बब्बर हा माधव नावाच्या, तर सई ताम्हणकर फूलमती नावाच्या स्थलांतरित कामगारांच्या भूमिकांमध्ये आहेत. कोविड साथीमुळे त्यांचे उपजीविकेचे मार्ग बंद पडून उपासमार सुरू होते आणि रेल्वेगाड्या व स्थानिक वाहतूक बंद असल्यामुळे त्यांना आपल्या गावी चालत जाणे भाग पडते. आणि अखेरच्या कथेत प्रकाश बेलावडी नागेश्वरच्या एका वयोवृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. नागेश्वर एका वेगळ्याच शहरात अडकले आहेत आणि आयुष्यातील कठीण काळातून जाणारी त्यांची मुलगी वेगळ्याच शहरात आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘वध’ चित्रपटात संजय मिश्रा साकारणार अनोखी भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -