विक्की आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हे दोघेही सध्या त्यांच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी भेट देत आहेत. दरम्यान, बुधवारी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत.

2 जूनला होणार चित्रपट प्रदर्शित

विक्की कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विक्की आणि सारा यात मुख्य भूमिका साकारत आहेत. यात विक्की कौशल कपिल ही भूमिका साकारत आहे. तर सारा अली खान सौम्या ही भूमिका साकारणार आहे.

काय आहे चित्रपटाची कथा

या चित्रपटात हे दोघे पती-पत्नी असून घटस्फोट घेण्याचे नाटक करताना दिसतील. कपिल आणि सौम्या जगासमोर दाखवतात की ते दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात पण एकांतात प्रचंड रोमान्स करतात. खरंतर, नवीन घर घेण्यासाठी हे दोघे घटस्फोटाचे नाटक करतात. कुटुंब मोठे आणि घर लहान असल्यामुळे कपल आणि सौम्या यांनी नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघे घटस्फोट घेण्याचे नाटक करतात. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एक जबरदस्त कॉमेडी फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार आहे.

 


हेही वाचा :

सलमान खानने मुलाच्या मदतीसाठी केली Bone Marrow Test; सुनील शेट्टींने सांगितला ‘तो’ किस्सा