दमदार डायलॉग-धमाकेदार ॲक्शनसह अजय देवगणच्या ‘भुज’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Trailer release of Ajay Devgn's 'Bhuj' movie with energetic dialogue
दमदार डायलॉग-धमाकेदार ॲक्शनसह अजय देवगणच्या 'भुज' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan)याचा बहुप्रतिक्षीत ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया'((Bhuj – The Pride Of India) सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज रिलज करण्यात आला आहे. चाहत्यांनी ट्रेलरला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. “मेरे मरने का मातम मत करना…मैंने खुद ये शहादत चुनी है..मैं जीता हूं मरने के लिए… मेरा नाम सिपाही” या डायलॉगने अजय देवगणच्या देशप्रेमाची झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे. विजय कर्णिक यांच्या भूमिका अजय देवगणने चोख बजावली आहे. तसेच चित्रपटात नोरा फतेही,संजय दत्त,सोनाक्षी सिन्हा,शरद केळकर यांची दमदार कामगिरी दिसत आहे.’भुज’ या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक दुधैया (Abhishek Dudhaiya)यांनी केले आहे. चित्रपटाची कथा 1971 सालातील इंडो-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. हा सिनेमा IAF स्क्वाड्रन लीडर विजय कार्निक हे भुज एयरपोर्टचे चार्ज होते तसेच कशाप्रकारे त्यांनी संपुर्ण एयरबेसला पुन्हा तयार केले तसेच त्यांच्या मदतीला कोणी पुढाकार घेतला या सर्वाचे चित्रण करण्यात आले आहे. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ सिनेमात विजय कार्निक यांच्या अभूतपुर्व कामगिरीवर भाष्य करण्यात आले आहे.(Bhuj – The Pride Of India Official Trailer)

 ट्रेलर पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

तसेच हा सिनेमा 13 ऑगस्ट रोजी डिज्नी-हॉटस्टारवर रिलज होणार आहे. ट्रेलरमध्ये अजयच्या धमाकेदार परफॉमन्सने चाहते खुप उत्सुक झाले आहेत. सिनेमा देखील तितकाच प्रभावी ठरणार की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.हे हि वाचा – Pavitra Rishta 2.0: ७ वर्षांनंतर पुन्हा ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस; शूटिंगला झाली सुरुवात