घरमनोरंजनसमीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या ‘दिठी’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या ‘दिठी’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Subscribe

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिठी' या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येते.

समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या ‘दिठी’चा ट्रेलर दर्शकांच्या भेटीला आला आहे. सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिठी’ या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येते. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.सुमित्रा भावे यांना 6 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 हून अधिक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या असंख्य कथा, पटकथा, गीते, त्यांचे कला दिग्दर्शन, वेशभुषा आणि दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले आहे. चित्रपटात अनेक नावाजलेल्या कलाकारांची वर्णी लागली आहे. अभिनेता किशोर कदम,डॉ.मोहन आगाशे,दिलीप प्रभावळकर,कैलाश वाघमारे,अमृता सुभाष,गिरीश कुलकर्णी आदि कलाकारांनी आपली भुमेकमध्ये जीव ओतला असून प्रत्येकाने आपली भूमिका अत्यंत प्रभावीपणे सकरली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटनिर्मात्या,दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले असून या चित्रपटामुळे त्यांच्या आठवणींवर  पुन्हा एकदा प्रकाश टाकला जाईल.

- Advertisement -

प्रसिद्ध मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि. बा. मोकाशी यांच्या ‘ आता आमोद सुनासी आले’ या कथेवर आधारित चित्रपट आहे.रामजी (किशोर कदम) यांच्या आयुष्यातील दुःखद घटनेवर पुस्तकात लिखाण करण्यात आले आहे. ‘दिठी’ मराठी चित्रपट २१ मे रोजी सोनीलाईव्ह ओरिजिनल्सवर प्रदर्शित होणार आहे.


हे हि वाचा – हरभजन सिंगने अभिनेता सोनू सुदवर केला कौतुकाचा वर्षाव!

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -