“संभाजीला समजून घेण्यासाठी काळीज शिवाजीचं करावं लागेल”, ‘सरसेनापती हंबीरराव’ ट्रेलर रिलीज

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत नव-नवीन धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. आता असाच एक बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाचे नाव ‘सरसेनापती हंबीरराव’ असे असून सध्या हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच या चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मुख्य भूमिका साकारली असून चित्रपटातील सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची भूमिका प्रविण तरडेंची पत्नी स्नेहल तरडे यांनी साकारली आहे.

हंबीरराव हे छत्रपतींचे मामा होते. मामा म्हणून नाते आणि स्वराज्यासाठीचे कर्तव्य एकाच वेळी पार पडणारा हा धुरंधर योद्धा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढणार आहे. साहस, शौर्य आणि उत्तम संवाद याने भरलेला हा ट्रेलर आहे.

‘परिस्थती जेवढी बिकट तेवढा मराठा तिखट’, ‘शिवाजी हा कोना एकाचा नाही तर समद्या रयतेचा आहे’, ‘संभाजी समजून घ्यायला काळजी शिवाजीचं असायला हवं’ असे काळजाचा ठोका चुकवणारे संवाद या ट्रेलरमधून समोर आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता वाढली आहे.

प्रवीण तरडे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.
‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ येत्या २७ मे रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट लवकरच