Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होतीस? तृप्ती देसाईंचा हेमांगीला...

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होतीस? तृप्ती देसाईंचा हेमांगीला सवाल

महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिकता बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि ते करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. मात्र अशावेळी अभिनेत्री हेमांगी कवी किंवा अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला नाही, असे म्हणत तृप्ती देसाईंनी नाराजी व्यक्त केली.

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ची अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या या फेसबुक पोस्टवरुन अनेक चर्चा सुरू आहेत. या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक संमिश्र प्रतिक्रीय येत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील हेमांगीच्या या पोस्टवर वक्तव्य केले आहे. अभिनेत्री हेमांगी कवी हिची पोस्ट शेअर करत तृप्ती देसाईंनी यांनी म्हटले आहे की, आम्ही शिर्डीच्या ड्रोसकोड विरोधात रान पेटवले होते तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती, असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याचप्रमाणे इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा तुम्ही कुठे होता, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. (Trupti Desai question to Actress Hemangi kavi bra and women post)

- Advertisement -

अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या पोस्टचे कौतुक करत तृप्ती देसाईंनी पुढे म्हटले आहे की, ‘त्यांच्या लेखाचे जाहीर स्वागत आहे. सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिकता बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि ते करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. मात्र अशावेळी अभिनेत्री हेमांगी कवी किंवा अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला नाही, असे म्हणत तृप्ती देसाईंनी नाराजी व्यक्त केली. पुढे तृप्ती देसाईंनी म्हटले आहे की, जेव्हा महिलांना मासिक पाळी सारख्या विषयावरुन दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते तेव्हा याविषयी आम्ही कृतीत आंदोलने केली पण अशा वेळी लोक आम्हाला का साथ देत नाहीत हे समजत नाही, असा टोला तृप्ती देसाईंनी लगावला आहे.

हेमांगी काय म्हणाली?

हेमांगीने पोळ्या करताचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात तिचे बूब्ज हलत होते. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले. त्यावर हेमांगी व्यक्त होत एक पोस्ट शेअर केली. ‘आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जाते. आम्ही सोशल मीडियावर कसे वागायचे? कसे बाहेर पडायचे हे आता आम्हाला समाज ठरवणार का?’ मी एक पोळी लाटतानाचा व्हिडिओ पोस्ट करत मला अनेक मेसेज आले. तू मुर्ख आहेस का? काम मिळवण्यासाठी काहीही करते? माझ्या घरी मुलगी असती तर कान फोडले असते असे म्हटले. मला ७-८ बायकांनी डिसेंट वाग असे म्हटले. पण कशासाठी? ती स्वत: देखील यातून जाते. १०० बायकांना विचारले तर त्यातील ९९ बायका ब्रा नाही, नकोसं वाटत म्हणतील. मग अभिनेत्री किंवा कोणत्याही मुलीवर हे का लादले जाते? तुमचं मत असेल, तर तुमच्याजवळ ठेवा. मी का करते, कशासाठी करते, पैसे मिळवायचे आहे का याबाबत लोक जजमेंटल होतात,म्हणून मी व्यक्त झाले असे म्हणत हेमांगीने तिच्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ‘ही’ला बघितल्यावर देवमाणूस मालिकेतील देवीसिंगची शुद्ध हरपणार

- Advertisement -