Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘तू झूठी मैं मक्कार’ ठरला 100 कोटींचा टप्पा पार करणारा वर्षातील दुसरा...

‘तू झूठी मैं मक्कार’ ठरला 100 कोटींचा टप्पा पार करणारा वर्षातील दुसरा चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कमाई करत आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. आता या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर ‘झ्विगाटो’ आणि ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटांना देखील मागे टाकत उत्तम कमाई केली आहे.

रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाने केला 100 कोटींचा टप्पा पार

लव रंजन दिग्दर्शित, या चित्रपटाने गेल्या आठवड्यातच जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला असून आता रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेला ‘पठाण’नंतरचा हा या वर्षातील दुसरा हिंदी चित्रपट आहे. दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने 1.96 कोटी कमावले. तर शनिवारी 3.41 कोटी कमावले आणि रविवारी 6.03 कोटी कमावले आहेत. दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला असून चित्रपटाने एकूण 109.63 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मोठ्या पडद्यावर होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्गने केली आहे. तसेच श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त यात अजय देवगण, डिंपल कपाडिया, बोनी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.


हेही वाचा :

बऱ्याच वर्षांनंतर तीच एनर्जी घेऊन सुनील शेट्टी ‘आँखों में बैसे हो तुम’वर थिरकला, पाहा VIRAL VIDEO

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -