‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. अशातच प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी देखील या चित्रपटाने करोडोंची कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चित्रपटाच्या कमाईचे नवे आकडे पाहिल्यानंतर चाहत्यांसह चित्रपटाते निर्माते देखील खूश झाले आहेत.

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी देखील 10 कोटींची कमाई केली. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींची कमाई केली होती तसेच आता चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी 16.57 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 53.16 कोटी कमावले आहेत.

v

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मोठ्या पडद्यावर होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्गने केली आहे. तसेच श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त यात अजय देवगण, डिंपल कपाडिया, बोनी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.

 


हेही वाचा : 

ऑस्कर 2023 ची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहाल?