घरमनोरंजन6 व्या दिवशी ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या कमाईत घसरण

6 व्या दिवशी ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या कमाईत घसरण

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या 5 दिवसात बॉक्स ऑफिसवर 70 कोटींचा आकडा पार केला होता. दरम्यान, आता 6 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

6 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत होते. पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी देखील 10 कोटींची कमाई केली. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींची कमाई केली होती तसेच प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी 16.57 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने 17.08 कोटी कमावले होते. मात्र, सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण पाहायला मिळाली. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 6 कोटी कमावले. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 76.26 कोटी कमावले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मोठ्या पडद्यावर होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्गने केली आहे. तसेच श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त यात अजय देवगण, डिंपल कपाडिया, बोनी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.

 


हेही वाचा :

‘नाटू नाटू’ची सुनील गावसकरांना देखील भुरळ; डान्स करत केला आनंद साजरा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -