Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनTula Japnar Aahe : देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त

Tula Japnar Aahe : देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त

Subscribe

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘तुला जपणार आहे’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे प्रेम मिळवताना दिसतेय. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होत आहे. एकूणच ‘तुला जपणार आहे’ या मालिकेने प्रेक्षकांसाठी एक वेगळं पण मनाला भावणारं कथानक टीव्हीवर आणलंय. त्यामुळे प्रेक्षकही या नव्या मालिकेशी कनेक्ट होताना दिसत आहेत. मागील आठवड्यात या मालिकेतील पात्राची प्रेक्षकांना ओळख झाली. पण येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मालिकेत काय पाहायला मिळेल? याची उत्सुकता असेल. तर याची थोडीशी कल्पना आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Tula Japnar Aahe Ambika got special powers)

मालिकेत अंबिकाला घरात प्रवेश आणि देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. देवीच्या कृपेने आता अंबिकाला एक विशेष शक्ती प्राप्त झाली आहे. जसा घराच्या दरवाजात बांधलेला पवित्र दोरा (दहन) जळतो, तशी अंबिका वेदाचे रक्षण करण्यासाठी घरात प्रवेश करते. ज्यामुळे वेदाचे प्राण वाचतात. पण जे कोण ह्यात सामील आहेत त्यांना धडा शिकवण्याचा अंबिका दृढ निश्चय करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दरम्यान, मीरा आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी गावात मोठ्या सणाचे आयोजन करण्याचे वचन देते. ती कुंकवाचा कलश उचलून हा सण पूर्ण करण्याचा निर्धार करते. अंबिका घरात वेदाच्या जीवावर उठलेल्या लोकांना धडा शिकवत असतानाच, मायाला जाणवतं की पवित्र दोरा तुटला आहे आणि नेमकं याच क्षणापासून मायाच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उत्सवाच्या विधी एक- एक करत पूर्ण करायचा मीराचा संघर्ष सुरू आहे. आता मीरा या उत्सवाचे सगळे विधी पार करू शकेल का? अंबिका कशाप्रकारे वेदाची रक्षा करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘तुला जपणार आहे’ या मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

हेही पहा –

Upcoming Marathi Movie : आरडीतून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम, टिझर लाँच