Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनTula Japnar Aahe : पहिल्यांदाच मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

Tula Japnar Aahe : पहिल्यांदाच मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

Subscribe

झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्ताने झी मराठीने उपस्थित पत्रकारांसोबत एका रोमांचक कथाकथनाचा अनुभव घेण्यासाठी अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हा लॉन्च इव्हेंट खरोखरच उपस्थितांसाठी वेगळा अनुभव ठरला. ‘तुला जपणार आहे’ ह्या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. तसेच या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर, अमोल बावडेकर ह्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

‘तुला जपणार आहे’ ही कथा आहे, एका आईची! अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतल आहे. त्यामुळे आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे. पण, आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे व तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट या सगळ्याचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं आहे. जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते. तसंच अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते. या दोघींच्या या नात्यामागचं गूढ काय असणार आहे ? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार हे पाहण्यासारखे असणार आहे.

तुला जपणार आहे या हॉरर, थ्रिलर आणि फॅमेली ड्रामा असणाऱ्या मालिकेतील प्रसंग आणि घटना larger than life असणार आहेत. तसेच या मालिकेचं आकर्षण आहे ते म्हणजे VFX. या मालिकेतील VFX अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे. या मालिकेचं पटकथा लेखन चेतन सैंदाणे करत आहे आणि पूर्णानंद वांढेकर यांनी संवाद लिहिले आहेत. तर मालिकेचे निर्माते आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे आहेत. मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी केले आहे.

 

 

 

 

हेही पाहा –